‘लोकसत्ता ९९९’ला बोरिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रोत्सवाचा जल्लोष वाढवणारा ‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ हा कार्यक्रम शनिवारी ललिता पंचमीच्या मुहूर्तावर बोरिवलीच्या जुनी एम. एच. बी. कॉलनी नवरात्रोत्सव मंडळात रंगला. स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांच्या उत्साही सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंबे कृपा करी, नदीच्या पल्याड, चला जेजुरीला जाऊ, माऊली या गाण्यांवर समूह नृत्य सादर केले, तर साक्षी दळवी आणि प्रतिभा कांबळी या जोडीने कोळीनृत्य सादर केले. ‘फुलोरा’ या ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वतीने मंगळागौर सादर केली.

बोरिवलीतील कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. खुशी या मुलीने रिंग प्रात्यक्षिक सादर करून कौतुकाची थाप मिळवली. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. पाककला स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री ऋजुता देशमुखने केले. अस्मिता मरगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर रश्मी पांडे द्वितीय, अनिता खंडेलवाल तृतीय, स्मिता भाटकर चौथ्या आणि पुष्पा पवार पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

‘जुनी एम. एच. बी. कॉलनी नवरात्रोत्सव मंडळा’ला त्यांच्या सहभागाबद्दल ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश देण्यात आला. ‘या कार्यक्रमामुळे आमच्या कॉलनीत एक आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. आमच्या वसाहतीतल्या रहिवाशांना यात कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नवरात्रीचे नऊ रंग आजच उधळले गेले आहेत असे आम्हाला वाटले,’ अशा शब्दांत मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले. ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मैदानात सर्व वयोगटांतील महिला-पुरुषांनी सहकुटुंब गर्दी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वानी उत्साहाने गरबा खेळायला सुरुवात केली.

प्रायोजक

राम बंधू चकली-चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ चे सहप्रायोजक केसरी टूर्स, रिजन्सी ग्रुप, कलर्स हे होते. हा कार्यक्रम पावर्ड बाय एम. के. घारे ज्वेलर्स होता. अपना सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर होते.

आज कुठे?

श्री जरीमरी माता उत्सव समिती, बोरभाट क्रॉस लेन, क्रांतिवीर राजगुरू मार्ग, गिरगाव, मुंबई-४

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta navratri festival
Show comments