मुंबई : ‘फेक न्यूज’ हा केवळ पत्रकारांचाच प्रश्न नाही, तर साऱ्या जगाचाच प्रश्न आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात साऱ्या जगाचीच चावडी झाली असून, यावर खोट्या बातम्या पसवण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परंतु खोट्या बातम्यांची सत्यता पडताळण्याची जबाबदारी ही केवळ पत्रकारांचीच नव्हे, तर सर्वांचीच आहे. या संकटास आळा घालण्यासाठी जागतिक संघटनांनी प्रयत्न केले, तंत्रज्ञान आणले किंवा नियम केले, तरच या वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या ‘फेक न्यूज’ला आळा बसेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समाज माध्यमांच्या या आभासी जगात खोट्या बातम्या, असत्य कथन, ‘एआय’ने तयार केलेली छायाचित्रे, समाज माध्यमांवरील खोट्या पत्त्यावरून टाकलेले मजकूर यांचा भडीमार सतत होत असतो. खोट्या बातम्या वेगाने पसरत जातात व त्यातून कोणाची बदनामी, कोणाचा अन्य काही हेतू साध्य होत असतो. या असत्य कथनामागची सत्यता पडताळणी करण्याचे मोठे आव्हान यापुढे प्रसारमाध्यमांवर आहे. त्यामुळे अशा फेक न्यूजची सत्यता पडताळणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या वतीने एका ‘फॅक्ट चेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनाआधी ‘फॅक्ट चेक’ची गरज या विषयावर एका परिसंवादात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरिश कुबेर, ‘न्यूज लॅब लीड’, ‘गुगल’च्या सुरभी मलिक, ‘बूम’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संपादक जेन्सी जॅकब, ‘डाटा लीड्स’ या संस्थेच्या प्रोग्राम हेड सानिया भास्कर आदी मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादात तज्ज्ञ व्यक्तींनी वरील मत व्यक्त केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या डेप्युटी कॉपी एडिटर अंकिता देशकर यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. तसेच, कार्यशाळेत मार्गदर्शनही केले. देशकर या गुगलने प्रमाणित केलेल्या फॅक्ट चेकर आहेत. गुगल हे या कार्यक्रमाचे टेक्नोलॉजी पार्टनर होते.

हेही वाचा >>>Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसटीएम परिसरात एकाला चिरडले

कार्यशाळेत व तत्पूर्वीच्या परिसंवादात मोठ्या संख्येने पत्रकारितेचे विद्यार्थी, विविध प्रसारमाध्यमांमधील पत्रकार, वाचक सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. या परिसंवादापूर्वी ‘लोकसत्ता डॉट कॉम’चे संपादक योगेश मेहेंदळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘फॅक्ट चेक’ची गरज का आहे याबाबत त्यांनी उदाहरणासहीत महत्त्व पटवून दिले.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या जबाबदारीत वाढ

गेल्या काही वर्षांत भारतात आणि एकूणच जगभरात खोट्या बातम्या पसरवण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे ‘फॅक्ट चेकर’ ही एक नवीन संकल्पना आणि नवीन कार्यक्षेत्र उदयास आले आहे. शक्ती कलेक्टिव्ह या एका छताखाली गुगलने ‘फॅक्ट चेकर’ सुरू केले असून यात अनेक माध्यम समूह, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सुरभी मलिक यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात प्रसारमाध्यम प्रतिनिधींची जबाबदारी वाढणार असून पत्रकारितेला विश्वासार्हतेच्या कसोटीतून जावे लागणार आहे, असे मत जेन्सी जेकब यांनी व्यक्त केले.