मागील स्पर्धेच्या विजेत्यांचे मत; १८ जानेवारीपासून राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेचे दुसरे पर्व रंगणार
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उत्तम वक्ते देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आत्मविश्वास, समाजात-आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाण, चौकसपणा आणि या सगळ्या विचारमंथनातून आपला नवा विचार मांडण्याची तयारी या सगळ्याचाच कस ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेत पाहिला जातो. या स्पर्धेत उतरताना तुमचा आत्मविश्वास आणि विषयांची सखोल तयारी महत्त्वाची आहे, असे मत मागील स्पर्धेच्या विजेत्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राची ओजस्वी वक्त्यांची परंपरा पुढे नेताना नव्या पिढीतून, नवे वक्ते घडवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ‘वक्ता दशसहस्रेषु’चे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वाला १८ जानेवारीपासून सुरुवात होणार असून १४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत रंगणाऱ्या विविध फेऱ्यांमध्ये राज्यभरातून विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. ‘जनता बँक’ सहप्रायोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा राज्यभरातील आठ प्रमुख शहरांमधील महाविद्यालयांमधून घेण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडेल. विभागीय प्राथमिक फेरीनंतर, विभागीय महाअंतिम फे रीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणाऱ्या प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फे रीत सहभागी होतील. या आठ जणांमधून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ निवडला जाणार आहे.
‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेसाठी निवडण्यात येणारे विषय हे रोजच्याच जगण्यातले असले तरी ते इतर स्पर्धापेक्षा वेगळे असतात, असे मत पहिल्या वर्षी सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व्यक्त केले आहे. आपल्या विचारांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली पाहिजे. या स्पर्धेत प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेल्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शनही मिळते, हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ असले तरी आपल्याला मिळणाऱ्या विषयांची सुसूत्र आणि मुद्देसूद मांडणी करता येणे महत्त्वाचे असल्याचा कानमंत्र गेल्या वर्षीच्या स्पर्धकांनी दिला आहे. नव्या विचारांच्या या मंथनाला लवकरच सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या अटी, नियम आदी तपशीलही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’ आणि ‘इंडियन ऑइल’ पॉवर्ड बाय ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेसाठी ‘युनिक अकॅडमी’, ‘स्टडी सर्क ल’ हे नॉलेज पार्टनर आहेत. या स्पर्धेचे नियम, अटी, विषय आदी तपशीलही ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या माध्यमातून स्पर्धकांपर्यंत पोहोचतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा