मुंबई : ‘पौष्टिक पदार्थ म्हणजे चवीशी तडजोड’ हा भ्रम मोडून काढणारा आणि खवय्यांचे मन तृप्त करणाऱ्या चविष्ट, पौष्टिक पदार्थाच्या पाककृतींचा खजिना असलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे झालेल्या या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेतील ठाणेकर सुगरणींचा उत्साह आणि त्यांच्या पाककृती पाहून सोहळय़ाला उपस्थित मान्यवर अतिथीही भारावून गेले.
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित पाककृती स्पर्धेत १६० हून अधिक सुगरण महिलांनी पौष्टिक व आरोग्यदायी असे नावीन्यपूर्ण पदार्थ मांडले. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘रत्नमाला’ यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार यांच्या हस्ते ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या सातव्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेतील पाककृतींच्या परीक्षणाबरोबरच विजेत्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आले. पितांबरी रुचियाना फूड डिव्हिजनच्या प्रिया प्रभुदेसाई, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी यांचे राहुल जोगळेकर, श्री धूतपापेश्वर लिमिटेडचे अखिलेश यादव आणि ब्रह्मविद्या साधक संघाच्या सविता सुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन भरडधान्य, आयुर्वेदिक आहाराचे महत्त्व आणि रानभाज्या या तिन्ही घटकांवर भर देत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या स्पर्धेत पाककृती सादर करायच्या होत्या. त्याला दाद देत स्पर्धकांनी ज्या कल्पकतेने हे आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ सादर केले होते ते पाहून आम्ही अक्षरश: स्तंभित झालो, अशी भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली. तर आपल्याला खाद्य संस्कृतीचा वैविध्यपूर्ण वारसा लाभला आहे, त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन शेफ वरुण इनामदार यांनी यावेळी केले.
सुगरणींचा उत्साह, निवेदिता सराफ आणि वरुण इनामदार यांना परीक्षक म्हणून आलेले अनुभव आणि इतर गमतीजमती आपल्या खुसखुशीत निवेदनातून उलगडत निवेदक कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर करोनामुळे गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा विशेषांक प्रकाशित होऊ शकला नाही. मध्ये इतका काळ जाऊनही या सातव्या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ज्वारी-बाजरीची पुरणपोळी, नाचणीची बर्फी
वयाचे कोणतेही बंधन न मानता उत्साहाने अनेक महिला आणि पुरुषही या स्पर्धेत सहभागी झाले होते. तृणधान्याची पौष्टिक कडबोळी, सर्व डाळींपासून तयार केलेली पौष्टिक वडी, नाचणीची बर्फी, नाचणी, ज्वारी व बाजरीच्या पिठापासून तयार केलेली पुरणपोळी, भगर पिठाच्या गोड व तिखट कचोऱ्या, लोहित भात (आयर्न राईस), पौष्टिक चीज पनीर वडी, रेनबो राइस केक, चाकवत भाजी व नाचणीचे तिखट मोदक आदी निरनिराळे चविष्ट व तितकेच आरोग्यदायी पदार्थ स्पर्धकांनी घरून तयार करून आणले होते. या पदार्थाच्या सभोवताली केलेली सजावटही सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. पदार्थाच्या अनुषंगाने अत्यंत खुबीने ही सजावट करण्यात आली होती.
यंदा ‘पूर्णब्रह्म’मध्ये काय?
आयुर्वेदिक आहार, पौष्टिक भरडधान्यांच्या वैशिष्टय़पूर्ण पाककृती आणि रानभाज्यांच्या पाककृतींचा खजिना ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकात उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीची वैशिष्टय़े जपत नावीन्यपूर्ण पाककृतींची विस्तृत माहिती असलेला ‘पूर्णब्रह्म’ विशेषांक आता वाचकांना उपलब्ध झाला आहे.
लोकसत्ता पाककृती स्पर्धेचे मुख्य विजेते (ठाणे विभाग) निकाल
’प्रथम क्रमांक : नीलिमा कोठावदे
’द्वितीय क्रमांक : अंजु शिरसाट
’तृतीय क्रमांक : हेमलता कुलकर्णी
’उत्तेजनार्थ पारितोषिके : नीलिमा कांदळगावकर, सुधा किनळेकर, उज्ज्वला जोशी, साधना राजे, सुमन सावे.
तांदळापासून बनविलेल्या पाककृती विभागातील विजेते
मनीषा चितळे, पूजा सावंत, अनुराधा मारावार, माधुरी कुळकर्णी, अलका मेमाने, डॉ. तृप्ती पोयरेकर
’टायटल पार्टनर : पितांबरी रुचियाना फूड डिव्हिजन
’सहप्रायोजक : अंजुमन- ए – इस्लाम, मेसर्स बी.जी.चितळे डेअरी आणि श्री धूतपापेश्वर लिमिटेड
’पॉवर्ड बाय : केसरी टुर्स, ब्रह्मविद्या साधक संघ आणि व्ही.पी.बेडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून ब्रह्मविद्या साधक संघाच्या सविता सुळे, पितांबरी रुचियाना फूड डिव्हिजनच्या प्रिया प्रभुदेसाई, प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार, बी.जी. चितळे डेअरीचे राहुल जोगळेकर, श्री धूतपापेश्वर लिमिटेडचे अखिलेश यादव आणि ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम.