मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला अवघे काही दिवस उरले असताना उत्तम एकांकिका सादर करण्यासाठी नेमके काय प्रयत्न करता येतील, याचे मार्गदर्शन युवा रंगकर्मींना मंगळवारी ‘रंगसंवाद’ या उपक्रमातून मिळणार आहे. स्पर्धेसाठी तयारी करत असताना महाविद्यालयीन स्पर्धकांना अनुभवी रंगकर्मींकडून या वेबसंवादाद्वारे मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

राज्यभरातील आठ विविध केंद्रांवरील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करून प्राथमिक फेऱ्यांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस विविध केंद्रांवरील प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, हे लक्षात घेत युवा रंगकर्मींना मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता रंगसंवाद’ या उपक्रमांतर्गत खास मार्गदर्शन मिळणार आहे. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून रंगभूमीवर नावाजलेले अजित भुरे आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम हे या वेबसंवादाद्वारे एकांकिकांचे सादरीकरण, आशय-विषय, लेखन, दिग्दर्शन, उत्तम संवादफेक करण्यासाठी आवाजावर कशा पद्धतीने मेहनत घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा >>>मालमत्ता कर न भरणाऱ्या ३ हजार मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई, २१८ कोटी ९६ लाखांची थकबाकी वसूल

लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा तपशील

पुणे विभागाची प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर, नाशिक विभागाची प्राथमिक फेरी ६ ते ७ डिसेंबर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नागपूर विभागाची प्राथमिक फेरी ७ ते ८ डिसेंबर, नागपूर विभागाअंतर्गत अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि पुसद विभागाची प्राथमिक फेरी ९ डिसेंबर, छत्रपती संभाजीनगर विभागाची प्राथमिक फेरी १० ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर पुणे विभागीय अंतिम फेरी ७ डिसेंबर, नागपूर विभागीय अंतिम फेरी १२ डिसेंबर, मुंबई विभागीय अंतिम फेरी १३ डिसेंबर, ठाणे, नाशिक, छत्रपती, संभाजीनगर व कोल्हापूर विभागीय अंतिम फेरी १४ डिसेंबर आणि रत्नागिरी विभागीय अंतिम फेरी १६ डिसेंबरला होईल. विभागीय अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या आठ एकांकिकांमध्ये मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी होणार असून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल. त्यानंतर महाअंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट ३ एकांकिकांचे सादरीकरण २२ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू प्राधिकरणाच्या उरण येथील सभागृहात होणार आहे.

हेही वाचा >>>मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का? दहिसरमधील मनसेच्या उमेदवाराचा ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर प्रश्न

सहभाग कसा घ्याल?

●http:// tiny. cc/ Lokankika2024 या संकेतस्थळावर क्लिक करून तुम्हाला ज्या सत्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्याप्रमाणे नोंदणी करा.

●नोंदणी करून झाल्यावर ‘लोकसत्ता’कडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे वेबसंवादाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता सहभागी होता येईल.

●अधिक माहितीसाठी http:// www. loksatta. com या संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क

मुंबई : मकरंद पाटील – ९८९२५४७२७५, ठाणे : कमलेश पाटकर (ठाणे ) – ९८२०६६४६७९, समीर म्हात्रे ( नवी मुंबई) – ९६१९६३०५६९, संजय भंडारे (वसई – विरार) – ७७२२०४८३८८, नीरज राऊत (पालघर) – ९९६०४९७३७८, अरविंद जाधव (डोंबिवली – कल्याण) – ९८२०७५२४५९, नाशिक : प्रसाद क्षत्रिय – ८०८७१३४०३३, रत्नागिरी : राजू चव्हाण – ९४२३३२२११६, पुणे : रामेश्वर बुट्टे – ७८७५९८०१८५, महेश निवांगुणे – ९९२२५३७५९९, छत्रपती संभाजीनगर : वंदन चंद्रात्रे – ९४२२२४५०६५, सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६, कोल्हापूर : संदीप गिरीगोसावी – ९६५७२५५२७७, नागपूर : गजानन बोबडे (नागपूर) – ९८२२७२८६०३, नितीन ईश्वरे (अमरावती- यवतमाळ) – ९७६३७०५८८७, भूषण दांडेकर (अकोला / बुलढाणा / वाशिम / पुसद) – ९०२८९३४४४६

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू प्राधिकरण

सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक : केसरी टूर्स

साहाय्य्य : अस्तित्व

टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स