‘लोकसत्ता’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘सर्वेकार्येषु सर्वदा’ या सामाजिक उपक्रमाला यंदाही दानशूर वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयात अद्याप वाचकांच्या मदतीचा ओघ अव्याहत सुरू असून दादर येथील चंद्रकांत सदाशिव कीर यांनी बहिणीच्या स्मरणार्थ या उपक्रमासाठी दीड लाख रुपयांची देणगी दिली आहे.
कीर यांनी तीन संस्थांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे धनादेश दिले आहेत. हे सर्व धनादेश त्यांनी आपली बहीण वंदना सदाशिव कीर यांच्या स्मरणार्थ दिले आहेत. त्यांनी दिलेले धनादेश हे प्रबोधिनी ट्रस्ट, इंद्रधनु प्रकल्प आणि झेप पुनर्वसन केंद्र यांच्या नावे दिले आहेत. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘लोकसत्ता’ने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये धडाडीने कार्य करणाऱ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील १० निवडक सामाजिक संस्थांचा वाचकांना परिचय करून दिला होता. या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलाच पण अनेकांनी या संस्थांना आर्थिक मदतीचा हातही दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा