मूळचा बदलापूरचा असलेल्या सौरभ पाटणकरने मुंबईत पीएचडीची पदवी मिळवली. त्यानंतर कॅनडा ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात संशोधन करताना त्याने पोलादापेक्षा मजबूत काष्ठ तंतू तयार केला. सौरभने कचऱ्यापासून मजबूत काष्ठ तंतू तयार केले. त्याने शेतातील जैविक कचऱ्याला जीवनउपयोगी घटकात बदलले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धान्य-जीवनसत्व संशोधनाचा विषय असलेल्या अमृता हाजराने कॅलिफोर्नियातील विद्यापीठात शिक्षण, संशोधन केले. सध्या ती पुण्यात संशोधन करत आहे. तिने बाजारी वर्गातील धान्याचे मानवी आहारातील महत्व यावर संशोधन केले आहे.

अकोल्याच्या जव्वाद पटेलने काही अफलातून उपकरणांची निर्मिती केली आहे. त्याने बनवलेले हेल्मेट तुम्हाला वेगाने बाईक चालवू देत नाही. बाईक चालवताना फोनवर बोलू देत नाही. त्याने पाणी टंचाईवर उत्तर शोधले आहे. त्याने वातावरणातील आद्रतेला पाण्यात बदलून दाखवले. जव्वारने बनवलेले डीव ड्रॉप यंत्र तासाला दोन लीटर पिण्यायोग्य पाणी तयार करते.

वयाच्या पंचविशीत यजुवेंद्र महाजनने पुण्यातील प्रतिष्ठीत नोकरी सोडली व दीप स्तंभ संस्था सुरु केली. आज या संस्थेचे १८ जिल्ह्यांमध्ये काम सुरु आहे. दीप स्तंभ संस्था गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याचे महत्वाचे काम करते.

अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्यांना काम मिळावं यासाठी संस्था चालवणाऱ्या सागर रेड्डीला सुद्धा तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने एकता निराधार संस्था स्थापन केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या छोटयाशा खेडेगावातून पुढे येत कविता राऊतने यशस्वी धावपटू अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून आपल्याला परिचित असलेली कविता आज ग्रामीण भागातील मुलींचे प्रेरणास्थान आहे.

सातारा जिल्ह्यातील ललिता बाबरही प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन पुढे आली आहे. अनेक अडचणींवर मात करुन यशस्वी धावपटू म्हणून ओळख निर्माण करणारी ललिता आजा राज्य, देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करत आहे.

वैशाली शडांगुळे हिला पेहरावशैलीसाठी तरुण तेजांकित पुरस्कार देण्यात आला. विदिशा या छोटयाशा गावातून आलेल्या वैशालीने हातमागाची कला पुनर्जिवीत करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. फॅशन विश्वात ओळख निर्माण करणाऱ्या वैशालीच्या डिझाइन्समध्ये पाश्चात्य आण भारतीय शैलीचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सर्वसामान्य परवडले पाहिजे यासाठी शंतनू पाठक काम करत आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी त्यांचे आपल्या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

टीव्ही आणि डिडिटल या दोन्ही माध्यमांमध्ये नावीन्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या निपुण धर्माधिकारीला कला क्षेत्रातला तरुण तेजांकित पुरस्कार देण्यात आला. बापजन्म या चित्रपटाचे आणि संशय कल्लोळ या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

राहुल भंडारे नाटय निर्माता होण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात आला. वेगळी नाटक करताना मनोरंजनाबरोबर सामाजिक भान जपणारा निर्माता अशी राहुल भंडारेची ओळख आहे.

मालिका, नाटय आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणा-या मुक्ता बर्वेला तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.