भविष्यानेही आशेने पाहावे अशा वर्तमानाचा गौरव असलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ गौरव सोहळा परेलच्या आयटीसी हॉटेलमध्ये संपन्न झाला. सौरभ पाटणकर, अमृता हाजरा, जव्वाद पटेल यांना संशोधन क्षेत्रातील कार्यासाठी लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
यजुवेंद्र महाजन, सागर रेड्डी यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कारने गौरवण्यात आले. वैशाली शडांगुळे यांना पेहरावशैलीसाठी तर शंतनू पाठकला नवउद्यानासाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले. क्रीडा क्षेत्रातून प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत या दोघींची निवड करण्यात आली.
कला क्षेत्रातून निपुण धर्माधिकारी, राहुल भंडारे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले. मूळचा बदलापूरचा असलेला संशोधक सौरभ पाटणकर लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला आहे. सौरभने केलेल्या संशोधनामुळे महागडी वैद्यकीय उपकरणा स्वस्तात उपलब्ध होऊ शकली.
#TarunTejankit: विज्ञान श्रेत्रातील पहिला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराचा मानकरी आहे सौरभ पाटणकर. त्याच्या पोलादापेक्षा मजबूत काष्टतंतूचं संशोधनासाठीhttps://t.co/6reAxuiPcg pic.twitter.com/JZxkvc67r3
— LoksattaLive (@LoksattaLive) March 31, 2018
अमृता हाजरा लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराची दुसरी मानकरी ठरली. अमृताने कॅलिफोर्निया येथे शिक्षण घेतले. सध्या तिचे पुण्यात संशोधन सुरु आहे.
#TarunTejankit: ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराची दुसरी मानकरी आहे अमृता हजराhttps://t.co/6reAxuiPcg pic.twitter.com/tFZv1jCOT4

जव्वाद पटेल तरुण तेजांकित पुरस्काराचा तिसरा मानकरी ठरला. फोनवर बोलू न देणार हेल्मेट पण त्याने बनवल होतं. त्याने अफलातून उपकरण बनवली.
#TarunTejankit: विज्ञान श्रेत्रातील ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ तिसरा मानकरी आहे जव्वाद पटेल.https://t.co/6reAxuiPcg pic.twitter.com/bQz0TO5oo3

सामाजिक क्षेत्रातील तरुण तेजांकित पुरस्कार दिपस्तंभ फाउंडेशनचा यजुवेंद्र महाजनला मिळाला. अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्यांना काम मिळावं यासाठी संस्था चालवणाऱ्या सागर रेड्डीला सुद्धा तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.
#TarunTejankit: ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारा मानकरी यजुर्वेन्द्र महाजन (दिपस्तंभ फाउंडेशन)https://t.co/6reAxuiPcg pic.twitter.com/F3U2q2pTOf

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकच्या कविता राऊत आणि ललिता बाबरला क्रीडा क्षेत्रातील लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.
वैशाली शडांगुळे हिला पेहरावशैलीसाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले. शंतनू पाठकला नवउद्यानासाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.
कला क्षेत्रासाठी निपुण धर्माधिकारी, राहुल भंडारे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.
आजच्या तरुणांची नवनिर्मिती, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्याकडून समाजास मिळणाऱ्या ऊर्जेचे भरभरून कौतुक आणि या ऊर्जावंतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’उपक्रम सुरू केला आहे. समाजात आजवर सर्वार्थाने न पोहोचलेल्या तळपत्या युवाशक्तीमधील बारा खणखणत्या नाण्यांना ‘लोकसत्ता’ नव्या उपक्रमाद्वारे ‘तरुण तेजांकित’ म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार सोहळा फेसबुकवर लाइव्ह दाखवण्यात आला.
#TarunTejankit: ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चा सोहळा Housefull… राजकारण, समाजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांची ‘भविष्यानेही आशेने पाहावे अशा ‘वर्तमाना’चा गौरव’ करण्यासाठी विशेष उपस्थितीhttps://t.co/ZfyIjh1oZt@girishkuber pic.twitter.com/94PfBZbIOD

फ्यूजन संगीतकार आणि कीबोर्डवर शास्त्रीय संगीताचे वादक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अभिजित पोहनकर यांच्या कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली. अभिनेते तुषार दळवी, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि तरुणाईला हसवणारे निपुण धर्माधिकारी तसेच कला क्षेत्रातले अन्य दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. उद्योग, कला, क्रीडा, समाजसेवा आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळयासाठी उपस्थित आहेत. उद्योगपती बाबासाहेब कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.
#TarunTejankit: बहुप्रतिक्षित ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या सोहळ्याची दिमाखात सुरुवात https://t.co/DSP9jdhyYR < या लिंकवर पाहा तरुण तेजांकित’च्या सोहळ्याचे थेट प्रसारण
सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहे अभिनेता @jitendrajoshi27 pic.twitter.com/FON4yVipSr— LoksattaLive (@LoksattaLive) March 31, 2018
साहित्य-कलेपासून समाजसेवेपर्यंत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवून काम करणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. आपल्या कामाने, त्यामागील विचाराने त्या-त्या क्षेत्रालाही ते नवे आयाम देत आहेत. कोणी आपल्या नैपुण्याने कलाक्षेत्र गाजवीत आहे, तर कोणी सर्व कोलाहलापासून दूर राहून वैज्ञानिक प्रयोगशाळांत नवनवे शोध लावत आहे. ज्यांच्याकडे आस लावून पाहावे असे हे राष्ट्राचे वर्तमान आहे. त्या सर्वाचा संघर्ष, त्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी असून ते सर्वासमोर यावे हा या तरुण तेजांकित उपक्रमामागचा महत्त्वाचा उद्देश आहे.
या सोहळयाला ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर आणि फ्यूजन संगीतकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेले त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या सुरांची साथ मिळणार आहे.
#TarunTejankit: मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची ‘चाय पे चर्चा’… अभिनेते तुषार दळवी, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि इतर मान्यवर…https://t.co/ZfyIjh1oZt pic.twitter.com/RjsYVCn6Mh

पुरस्कारासाठी अशी झाली निवड
‘तरुण तेजांकित’साठी ‘लोकसत्ता’ने स्वनामांकन अर्ज मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५०० अर्ज ‘लोकसत्ता’कडे आले होते. त्या अर्जाची छाननी करून अंतिम निवडीसाठी ४२ जणांचा विचार करण्यात आला. या ४२ जणांमधून १२ ‘तरुण तेजांकित’ निवडण्यात आले आहेत. बारा तरुण तेजांकितांची निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊसकुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एलआयटी फायनान्स होल्डिंगचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता.
कार्यक्रमाचे टायटल पार्टनर
‘केसरी टूर्स’ असून ‘मिराडोर’ आणि ‘सारस्वत बँक’ असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि., एम. के. घारे ज्वेलर्स, अनुरूप विवाह संस्था आणि न्युट्रीव्हॅल्यू तर हेल्थपार्टनर ‘आयुशक्ती’ आहेत. ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ हे हीलिंग पार्टनर, ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ नॉलेज पार्टनर, ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘फिव्हर १०४ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.