मुंबई : वर्तमानाकडे जागरूकतेने पाहू इच्छिणाऱ्या सुजाण आणि सजग नागरिकांना गतवर्षांतील ठळक नोंदींचे भांडार ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकातून उपलब्ध होत असते. या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यास कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग, मनोरंजन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकसत्ता वर्षवेध’ उपक्रमाचे कौतुक केले. तसेच हा विशेषांक सर्व वाचकांसाठी आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचूक ज्ञानखजिना असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांमधून उमटली.
विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत तसेच विविध क्षेत्रांतील मंडळींपासून वाचकांपर्यंत सर्वांसाठी ज्ञानखजिना ठरणाऱ्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रकाशन करण्यात आले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मुक्त संवाद’ साधला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहत एकमेकांशी संवाद साधला आणि आपापल्या क्षेत्रातील चालू घडामोडींची एकमेकांना माहितीही दिली. ‘लोकसत्ता वर्षवेध’ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींची एकाच ठिकाणी भेट होऊन ज्ञानाची देवाणघेवाण होत असल्यामुळे मान्यवरांमध्ये चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी अनेकांना एकमेकांसोबत छायाचित्र टिपण्याचा मोह आवरला नाही. २०२४ या वर्षात घडलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टींचा आढावा ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकामध्ये वाचायला मिळणार आहे, त्यामुळे भविष्याकडे वाटचाल करताना भूतकाळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा हा खजिना उपयुक्त ठरणार असल्याचेही मत मान्यवरांनी व्यक्त केले. कुणाल रेगे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी ‘वर्षवेध’ विशेषांकांचा उपक्रम राबविला जात आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांपासून वाचकांकडून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे या विशेषांकांचे प्रकाशनानंतर अनेकदा पुनर्मुद्रण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय घडामोडींसह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील महत्त्वपूर्ण घटना यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकी आणि भारतीय निवडणूक, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण ठरलेले वर्ष, वाळवंटात पडलेला मुसळधार पाऊस, आखाती देशातील पूर आदींचे सचित्र तपशील अंकात असून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील. तसेच अर्थ, शेती, हवामान, मनोरंजन, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील घटनांचे विश्लेषण वाचायला मिळणार आहे.
यंदाच्या ‘लोकसत्ता वर्षवेध’चे आकर्षण
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आलेले देवेंद्र फडणवीस, पर्यावरणाच्या कामासाठी जागतिक सन्मान मिळविणारे माधव गाडगीळ, बुद्धिबळात लहान वयात जगज्जेता बनलेला गुकेश, जागतिक चित्रपट विश्व गाजवणारी भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडिया यांची दखल घेणारे मान्यवरांचे लेख हे यंदाच्या ‘लोकसत्ता वर्षवेध’चे खास आकर्षण आहे.
‘लोकसत्ता अग्रलेख’ या पुस्तकाचेही प्रकाशन
दै. ‘लोकसत्ता’मधील २०१७ ते २०२४ या काळातील अग्रलेखांचा संच असलेल्या गिरीश कुबेर लिखित ‘लोकसत्ता अग्रलेख” या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
राजकीय क्षेत्र
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री पंकजा मुंडे, उद्याोग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, कामगारमंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री छगन भुजबळ, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, भाजप आमदार अतुल भातखळकर, शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाजपचे माजी आमदार राज पुरोहित, माजी महापौर निर्मला सामंत, शिवसेना (शिंदे) नेत्या शायना एनसी, भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस सचिन सावंत, राष्ट्रवादीचे (अजित पवार), मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे व सूरज चव्हाण, शिवसेना (शिंदे) प्रवक्ते राजू वाघमारे, महावितरणचे स्वतंत्र संचालक व भाजप प्रवक्ते विश्वास पाठक, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान.
सरकारी अधिकारी
मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम आणि राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, आयकर आयुक्त पल्लवी दराडे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, उद्याोग विभागाचे प्रधान सचिव पी. अलबगन, निवृत्त सनदी अधिकारी राजीव जलोटा, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, सनदी अधिकारी अभिजीत घोरपडे, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे (म्हाडा) मुख्य अधिकारी, मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा प्राधिकरणाचे अनिल वानखेडे, गृहरक्षक दलाचे सहायक संचालक विजय कलवले, राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे.
शिक्षण
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. विलास पाध्ये, सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, आयआयटी मुंबई मुख्य सल्लागार प्रा. नयन दाभोळकर, आयआयटी मुंबई संचालक प्रा. शिरीष केदारे, आयआयटी मुंबई उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे.
पोलीस अधिकारी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) निकेत कौशिक, अपर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) विश्वास नांगरे-पाटील, रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपायुक्त अकबर पठाण.
करमणूक विभाग
ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कवी अरुण शेवते, माध्यम जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे, जिओ स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख निखिल साने.
मुंबई महापालिका अधिकारी
किशोर घाडीगावकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), उत्तम भागात (साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, किरण दिघावकर (उप आयुक्त, मुंबई महानगरपालिका), जयदीप मोरे (साहाय्यक आयुक्त, ए विभाग), तानाजी कांबळे (मुख्य जनसंपर्क अधिकारी), प्रशांत डेसले (उप जनसंपर्क अधिकारी).
अधिकारी वर्ग
मायकल मॅन्युअल राज, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त, प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख सुनील कांबळे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे.
विविध क्षेत्रातील नामवंत
अर्थतज्ज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, लेखक सुधींद्र कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर, सुनिल मोने (संचालक भारत डायनामिक्स, एनकेजीएसबी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी, टीजीएसबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, ज्येष्ठ सनदी लेखापाल दीपक टिकेकर, मकरंद हेरवाडकर, अजय वाळिंबे, वसंत कुलकर्णी, आशीष ठाकूर, समीर नेसरीकर, विजतज्ञ अशोक पेंडसे.
क्रीडा
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले, ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, महाराष्ट्र कॅरम संघटन सचिव अरुण केदार, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक वर्षा उपाध्ये.
वैद्याकीय क्षेत्र
डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्रचिकित्सक, डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, शीव रुग्णालय, डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय, डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय, डॉ. निखिल दातार, स्त्री रोगतज्ज्ञ, क्लाऊड नाईन रुग्णालय, डॉ. राहुल पंडित, चेअरमन, क्रिटिकल केअर अँड इमर्जन्सी, सर एच. एन. रिलायन्स रुग्णालय, डॉ. तुषार पालवे, वैद्याकीय अधीक्षक, कामा रुग्णालय, डॉ. राजीव बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. रेखा डावर, स्त्रीरोग तज्ज्ञ , डॉ. गुस्ताद डावर.