देशाचा अर्थप्रपंच आणि जनसामान्यांचा संसार नेटका करू पाहणाऱ्या अर्थसंकल्पाला अभूतपूर्व करानो संकटातून सावरण्याचाही पैलू आहे. अर्थसंकल्पाच्या या ‘न भूतो, न भविष्यती’ वैशिष्टय़ाचे कंगोरे आपल्यापुढे नेमके कोणत्या अर्थाने येतील, ते उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ पार पाडणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडतील आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता आयोजित ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात, करोनाकालीन आर्थिक चणचणीच्या स्थितीत अर्थमंत्र्यांनी साधलेल्या कसरतींचा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे वेध घेतील.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
rbi cuts growth forecast to 6 6 percent
विकास दराचा अंदाज कमी; रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी ६.६ टक्क्यांचे अनुमान

करोना संकटाने जनसामान्यांच्या जीवनात केलेली उलथापालथ आणि टाळेबंदी-निर्बंधांचे अर्थ जीवनावरील घाव ताजे असताना, यंदाचा अर्थसंकल्प या संबंधाने दिलासा देण्याचे काम करेल की, खिशाला कात्री लावणारा मध्यमवर्ग-पगारदारांवरील करांचा जाच वाढेल, हे अर्थमंत्र्यांच्या सोमवारच्या भाषणातूनच स्पष्ट होईल. घोषणांचे माप नेमके कसे पडते, त्याचे महत्त्व आणि अर्थ समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण निश्चितच उद्बोधक ठरेल.

अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण

सोमवार, १ फेब्रुवारी, सायं.६वा.

वक्ते : गिरीश कुबेर

संपादक-लोकसत्ता

सहप्रायोजक :

* पुनित बालन ग्रुप,

* लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पॉवर्ड बाय :

* स्टोरीटेल अ‍ॅप

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. सहभागासाठी

https://tiny.cc/Ls_BudgetVishleshan_2021

येथे नोंदणी आवश्यक.

Story img Loader