‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची उत्सुकता नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांमध्ये शिगेला पोहोचली आहेच शिवाय मान्यवरांमध्येही या स्पर्धेचा बोलबाला आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना http://www.loksatta. com/lokankika या लोकांकिकाच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अॅपवर तरुणाईच्या हिट्सची संख्याही वाढली आहे.
‘लोकांकिका’ स्पर्धेची राज्यभरातील केंद्रे, सविस्तर वेळापत्रक, पारितोषिके, नियम व अटी, बातम्या, प्रायोजक या सर्व गोष्टी संकेतस्थळावर अतिशय सोप्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील कुठल्याही भागातील महाविद्यालयांना ‘लोकांकिका’ स्पर्धेचे प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्याची ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळेच, ‘लोकांकिका’ सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली असून स्पर्धेसंदर्भातील छायाचित्रे आणि व्हिडीओ गॅलरीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व ‘झी मराठी’ वाहिनीकडे असेल.
रंगभूमी, मालिका, चित्रपटांतील आघाडीच्या कलाकारांनीही या उपक्रमाचे प्रचंड कौतुक केले आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री मनवा नाईक यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यासारख्या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात पाय रोवू पाहणाऱ्यांसाठी एकांकिका स्पर्धाचे महत्त्व स्वानुभवावरून सांगत तरुण रंगकर्मीना या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छाही दिल्या आहेत. एकांकिका अभिनयाचा अमीट संस्कार घडविते, असे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी म्हटले आहे. रंगभूमीशी संबंधित विविध भागांचे प्रशिक्षणही अशा स्पर्धातून साधते, असे अभिनेत्री मनवा नाईकने म्हटले आहे. तर एकांकिकांमधून सर्जनशीलतेला मोठाच वाव मिळतो, असे बुजूर्ग अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी नमूद केले आहे.
मान्यवरांच्या शुभेच्छांचे सर्व व्हीडिओ indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika/videogallery येथे पाहता येतील.
‘लोकांकिका’चा मान्यवरांमध्येही बोलबाला
‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची उत्सुकता नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांमध्ये शिगेला पोहोचली आहेच शिवाय मान्यवरांमध्येही या स्पर्धेचा बोलबाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-11-2014 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksattas lokankika competition