देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईवर माणसांचे लोंढे आदळत असल्यामुळे साथीच्या आजारांपासून आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसताना मुंबई महापालिकेने मात्र मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करून गेली काही वर्षे पद्धतशीरपणे साथीच्या आजारांपासून ते सुपरस्पेशालिटी उपचारापर्यंत सर्व पातळींवर आरोग्यसेवा उंचावत नेली आहे. महापालिका आगामी वर्षांत आरोग्यावर २५०८ कोटी रुपये खर्च करणार असून ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा ६७८ कोटी रुपयांनी जास्त आहे.
या निधीतून उपनगरातील रुग्णालयांमध्ये ६०८ खाटा वाढविण्यात येणार आहेत. तेथे एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. क्षयरोग व एमडीआर क्षयरोगाला आळा घालण्यासाठी कूपर रुग्णालयासह प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘जेनएक्स’सारखी अद्ययावत निदानसेवा सुरू केली जाणार आहे. शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात एमडीआर टीबीसाठी २०० रुग्णशय्यांचे देशातील पहिले रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या व त्यावरील खर्च लक्षात घेऊन नायर रुग्णालयात केमोथेरपीसाठी ७५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रेडिओथेरपीसाठी अद्ययावत लिनिएर अॅक्सिलरेटर आणि पेट स्कॅनर खरेदी करण्याची योजना आहे. कॅन्सर रुग्णांसाठी अद्ययावत सेवा पुरवणारे रुग्णालय उभे करण्याचा मानस आयुक्त सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला आहे.
केईएम, शीव आणि नायर या प्रमुख रुग्णालयांचे १६ उपनगरीय रुग्णालयांबरोबर ‘लिंकेज’ करण्याबरोबरच या उपनगरीय रुग्णालयांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दवाखान्यांची दजरेन्नती, उपनगरीय रुग्णालयांचे अत्याधुनिकीकरण, कूपर रुग्णालय, कांदिवली येथील शताब्दी आणि जोगेश्वरी येथील अजागावकर रुग्णालय या वर्षी अनुक्रमे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. भगवती रुग्णालयातील ६०० खाटांच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही आगामी वर्षांत सुरुवात होणार आहे. तसेच ५० डायलिसीस बेड वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव व मानसिक आरोग्याचा विचार करून संबंधितांना समुपदेशन करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. मधुमेही रुग्णांसाठी ८० दवाखान्यांमध्ये तपासणी तसेच मधुमेहींसाठी सेंट्रल डेटा बेस तयार करण्यात येणार असून यामुळे मधुमेही रुग्णांना नियमित उपचार घेणे शक्य होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2013 रोजी प्रकाशित
आरोग्यासाठी ६७८ कोटींची हनुमानउडी!
देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईवर माणसांचे लोंढे आदळत असल्यामुळे साथीच्या आजारांपासून आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसताना मुंबई महापालिकेने मात्र मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करून गेली काही वर्षे पद्धतशीरपणे साथीच्या आजारांपासून ते सुपरस्पेशालिटी उपचारापर्यंत सर्व पातळींवर आरोग्यसेवा उंचावत
First published on: 05-02-2013 at 04:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long jump for health of 678 crores