मुंबईः कांदिवली पश्चिम येथील एका घरात शिरलेल्या दोन आरोपींनी गृहिणीला बांधून ठेवले आणि घरातील पाच तोळ्यांचे दागिने लुटून नेले. आरोपीने चेहऱ्यावर मुखपट्टी घातली होती. आरोपी त्याच परिसरात राहणारे असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस तपास करीत आहेत.चारकोप, कांदिवली पश्चिम येथील भाब्रेकर नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीत गुरुवारी हा प्रकार घडला. मुखपट्टी घातलेले दोन आरोपी सकाळी पावणेआठच्या सुमारास घरात शिरले होते. आरोपींनी घरामध्ये प्रवेश कसा केला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच इमारतीच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात कोणीही संशयीत दिसत नसल्यामुळे आरोपी त्याच इमारतीतील असल्याचा संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा प्रकार घडला, त्यावेळी तक्रारदार महिला घरात काम करीत होती. तिचा लहान मुलगा झोपला होता. चोरांनी तिचे हात दुपट्ट्याने बांधले आणि तिला ब्लेडचा धाक दाखवून धमकावले. त्यांनी तीन लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले आणि नंतर पळून गेले. महिलेने आरडाओरडा केला असता त्यांचा मुलगा जागा झाला. तिने मुलाला शेजारच्या घरात पाठवले. त्यानंतर शेजारी महिलेच्या घरात आले व त्यांनी महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेने घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेचा पती कामानिमित्त इतर ठिकाणी राहतो. तक्रारदार महिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. तळमजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात कोणीही व्यक्ती इमारतीत येताना दिसली नाही. त्यामुळे पोलिसांना परिचित व्यक्तीचा याप्रकरणात सहभागाचा संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.