लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र काही कारणाने अर्जविक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Abdul Sattar
Abdul Sattar : एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “पुढच्या अडीच वर्षांत….”
CM Devendra Fadnavis On Happy New Year 2025
Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
Political Dramas in 2024
Year Ender : २०२४ या वर्षात महाराष्ट्रात पाहण्यास मिळालेली राजकीय नाट्यं कुठली?

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यातही ७ किंवा ८ ऑक्टोबरला सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाकडून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील २०३० घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत काढण्यात आली. तर या सोडतीअंतर्गत अर्जविक्री-स्वीकृतीस ९ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने मुंबई मंडळाने सोडतीस १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या सोडतीतील सर्वच योजनेतील घरे प्रचंड महाग असल्याने सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अर्जविक्री-स्वीकृतीची ४ सप्टेंबर अशी अंतिम मुदत पुढे ढकलत या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार मागील आठवड्यात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अर्जविक्री-स्वीकृतीची अंतिम तारीख १९ सप्टेंबर अशी करण्यात आल्याचे जाहीर केले.

आणखी वाचा- पोक्सो गुन्हे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याचे पोलिसांना आदेश

तर दुसरीकडे सोडतीतील पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या ३७० घरांच्या किमतीतही १० ते २५ टक्क्यांनी कपात केली. या सर्व पार्श्वभूमीवर साहजिकच १३ सप्टेंबर रोजी होणारी सोडत पुढे गेली. दरम्यान सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करू असे मुंबई मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही नवीन तारीख तसेच पात्र अर्जदारांची प्रारूप यादी, अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होणार हेही अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोडतीच्या तारखेकडे आणि सोडत पूर्व प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे अर्जदार, इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-‘पॉड टॅक्सी’च्या निविदेत हैदराबाद येथील कंपनीची बाजी

‘अर्जदार, इच्छुकांची प्रतीक्षा संपली’

अर्जदार आणि इच्छुकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण मुंबई मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेचे वेळापत्रक आणि सोडतीची तारीख निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. ७ आणि ८ ऑक्टोबर अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी जी कोणती तारीख गृहनिर्माण मंत्र्यांकडून अंतिम होईल त्या तारखेला सोडत काढण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यानुसार एक-दोन दिवसांत तारीखेची घोषणा मंडळाकडून केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्याच वेळी वांद्रयातील रंगशारदा सभागृह किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोडत होणार हेही एक-दोन दिवसांत अंतिम केले जाणार आहे.

Story img Loader