वाकोला येथे राहणाऱ्या सोनल बगारे (२४) या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी उमाशंकर कुशावत याला अटक केली आहे. सोनलच्या आत्महत्येच्या अवघ्या चार दिवस आधी या दोघांनी लग्न केले होते.
रविवारी सोनलनेआपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. ती एमबीएची विद्यार्थिनी होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तिचा प्रियकर उमाशंकर कुशावत याच्यावर संशय व्यक्त केला होता. उमाशंकर सोनलसोबत एमबीएचे शिक्षण घेत होता. त्याच्या चौकशीत या दोघांनी सोनलच्या आत्महत्येच्या चार दिवस आधी लग्न केल्याचे उघड झाले. लग्नानंतर गावी राहण्याच्या मुद्दय़ावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वादामुळेच निराश झालेल्या सोनलने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे.
आणखी वाचा