मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ ची मंगळवार, ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ या कालावधीत संरतनात्मक तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या कांदिवली, बोरिवली, दहिसरमधील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या संरचनात्मक तपासणीसाठी बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. या कालावधीत आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर या भागात बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ३ मधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: पुनर्विवाहित मुस्लिम महिलेलाही देखभाल खर्च मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
आर दक्षिण विभागातील महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व समता नगर-सरोवा संकुल तर, आर मध्य विभागातील ला-बेल्लेजा व ला-वेस्टा या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच आर उत्तर विभागांमधील शिव वल्लभ मार्ग, मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा तसेच एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदिर मार्ग, अष्टविनायक चाळ या ठिकाणीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. आर उत्तरेकडील आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर, तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग आदी परिसरातील नागरिकांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कालावधीत संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.