मुंबई : लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलायल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्याचे काम लांबणीवर पडले आहे. ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये गर्डर बसविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. पावसाळा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे गर्डरचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याने २४ जुलै २०१८ पासून तो दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. पादचाऱ्यांना पूल नसल्याने करी रोडवरुन वरळी नाका व त्यापुढे जाण्यासाठी थेट मार्ग नाही. त्यामुळे अनेक जण वरळी नाक्यापर्यंत चालतच जातात तर वाहन चालकांना भायखळामार्गे जाऊन पूर्ण वळसा मारावा लागतो. त्यात प्रचंड हाल होत आहेत. गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड जेल मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग याशिवाय करी रोड, लोअर परळ परिसरातील रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहन चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत होती.

अखेर पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगर पालिकेने  रेल्वे हद्दीवरील या पुलाचा भाग तोडण्याचे काम टप्प्याटप्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु केले. हे काम पूर्ण होताच पुलावर नव्याने पहिला गर्डर बसविण्याच्या कामाला विलंब झाला आणि  गेल्या जून महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. १,०४५ टन वजनाचा आणि ९० मिटर लांबीचा गर्डर बसविण्यात आला. दुसरा गर्डर ऑगस्ट महिन्यात बसवण्यात येणार होता. मात्र आता हा मुहूर्त हुकला आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आणि काही तांत्रिक समस्या असल्याने सप्टेंबरमध्ये दुसरा गर्डर बसविण्याचे काम करण्यात येईल,  अशी माहिती पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. रेल्वे हद्दीतील या कामाचा खर्च सुमारे १२५ कोटी रुपये आहे.