मुंबई : गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेला लोअर परेल रेल्वे उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. हा पूल गणेशोत्सवाआधी सुरू करण्यासाठी स्थानिकांचा दबाव वाढू लागला होता. लोअर परेल नागरिक उड्डाणपूल नागरिक कृती समितीने बुधवारी संध्याकाळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याआधीच प्रशासनाने पूल सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ मध्ये बंद करण्यात आला. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले आहे. लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. लोअर परेल पुलाची पश्चिम दिशेची एक बाजू जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत हुकली. गणेशोत्सवाच्या काळात लोअर परेल, करीरोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा पूल सुरू करावा अशी मागणी होऊ लागली होती. पूल विभागाने तशी तयारी सुरू केली होती. मात्र नंतर ही मुदतसुद्धा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यातच आता करीरोडकडे जाणारी बाजू गणेशोत्सवाआधी सुरू करण्यात येणार असल्याचे पूल विभागाचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी याला दुजोरा दिला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वार दोन महिन्यानंतर खुले

रेल्वे आणि पालिका यांनी मिळून बांधलेला हा पूल आहे. रेल्वेच्या हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेले रेल्‍वेला निधी दिला आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामासाठी पालिकेने १३८ कोटींचे कंत्राट दिले आहे. या पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जूनपासून वाहनचालकांसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचा एक टप्पा पूर्ण झाला. मात्र पूर्वेकडील बाजू अद्याप सुरू न झाल्यामुळे संपूर्ण पुलाचा अद्यापही वापर करता येत नाही. संपूर्ण पूल सुरू होण्यास पालिका प्रशासनाने आधी जुलै अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत हुकल्यानंतर सप्टेंबरमध्ये हा पूल सुरू करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>>संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशांवर कमळाचं फूल, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…

एप्रिलमध्ये हा पूल सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र काँक्रिटीकरणासाठी लागणारी खडी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे दोन आठवडे काम रखडले होते. तर त्याआधी ट्रँकरच्या संपामुळे पाण्याअभावी काम रखडले होते. त्यानंतर हा पूल मे २०२२ मध्ये सुरू होणार होता. मात्र विविध कारणांमुळे दोनदा मुदत वाढत गेली . नंतर १५ जूनची मुदत तिसऱ्या वेळी देण्यात आली. त्यानंतर या पुलासाठी जुलै अखेरीसची मुदत देण्यात आली होती. आता ती मुदत देखील उलटली असून सप्टेंबर अखेरपर्यंत हा पूर्ण पूल सुरू करण्यात येणार आहे. पावसामुळे या पुलाचे कॉंक्रिटीकरण करता आले नाही, त्यामुळे हे काम रखडल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader