शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेनंतर फरार झालेला इमारतीचा मुख्य ठेकेदार लक्ष्मण राठोड याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच लातूर येथून अटक केली आहे.
लकी कंपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत कोसळून ७४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिल्डर, त्याचे भागीदार, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस हवालदार, पत्रकार, नगरसेवक आदींना अटक केली होती. त्यापैकी काहींची जामीनावर सुटका झाली आहे. इमारत दुर्घटना घडली, त्यावेळी राठोड तेथे उपस्थित होता. मात्र, या घटनेचा अंदाज येताच त्याने तेथून पळ काढला होता. तो मुळगावी लातूरला पळून गेल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यानुसार, पोलिसांनी दोनदा लातूरला जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, त्यावेळी तो त्यांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, गेल्या आठवडय़ात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लातूर येथून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘लकी कंपाऊंड’च्या मुख्य ठेकेदारास अटक
शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेनंतर फरार झालेला इमारतीचा मुख्य ठेकेदार लक्ष्मण राठोड याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच लातूर येथून अटक केली आहे.
First published on: 15-07-2014 at 01:46 IST
TOPICSकंत्राटदार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucky compounds main contractor arrested