पर्यटन व्यवसाय व त्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेल व्यवसायासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही सवलती बहाल करण्यात आल्या आहेत. यात ऐषाराम कर कायद्याखाली सध्या प्रतिदिन प्रतिकक्ष ७०० रुपयांपर्यंतच्या भाडे आकारणीस करमाफी आहे ती मर्यादा आता एक हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
पर्यटन धोरण २००६ नुसार मुंबई, मुंबई उपनगर जिल्हे, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड या क्षेत्रातील हॉटेल व्यवसायातील गुंतवणुकीवर सवलत जाहीर करण्यात आली आहे. तथापि या ‘अ’ वर्ग महापालिका क्षेत्रात हॉटेल व्यवसायात होणारी गुंतवणूक ही फायदेशीरच ठरणारी असल्यामुळे पर्यटन धोरण २००६ मध्ये सुधारणा करून ‘ब व क’ वर्ग क्षेत्रातील पात्र हॉटेलच्या ऐषाराम करात माफी देण्य़ात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र ऐषाराम कर अधिनियम १९८७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त गुंतवणुकीमुळे अतिरिक्त क्षमता वाढत असल्यास अशा अतिरिक्त क्षमतेवर येणाऱ्या ऐषाराम करदायित्वाला माफी मिळणार आहे.
ठळक वैशिष्टय़े
* ऊस खरेदी कर माफ
* कापसावरील कर पाच टक्क्यांवरून दोन टक्के
* शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी संजीवनी योजना आणण्याचे सुतोवाच
* फुटाणे, डाळ्यांवरील कर रद्द
* अनुत्पादित (नॉन ब्रॅण्डेड) तंबाखुवरील कर माफ
* व्यवसाय कर आकारणीची वेतन मर्यादा पाच हजारांवरून साडेसात हजार. आठ लाख कामगारांना लाभ
* मतिमंद व्यक्तींना व्यवसाय करात पूर्ण सूट
* ऐषाराम करमाफीच्या मर्यादेत ७५० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढ
* व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी व्हॅटच्या करप्रमाणील बदल
* केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांना विक्रीसाठी पाच टक्के सरसकट कर
* विमानाच्या सुट्टय़ा भागांवरील करमाफ
* रस्ते विकासासाठी २८३६ कोटींची तरतूद, तरीही ती अपुरीच.
* मराठी भाषा विकास आणि सांस्कृतिक केंद्र उभारणीसाठी ८० कोटी.
* सिनेमॅटोग्रफिक फिल्मच्या कॉपीराईट्सच्या विक्री किंवा लिजवरील कर माफ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा