प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित यांच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी (१२ मार्च) वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दुपारी ३ वाजता वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने यांनी निवेदन जारी करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “आमची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या प्रियजणांच्या उपस्थितीत सकाळी निधन झालं.”
मागील आईच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त माधुरी दीक्षित यांनी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी आईबाबतच्या आपल्या हळव्या भावना व्यक्त केल्या होत्या.
हेही वाचा : ‘दिल तो पागल है’ ला २५ वर्षे पूर्ण, माधुरी दीक्षितने सांगितले चित्रपटातील आवडते गाणे
या पोस्टमध्ये माधुरी दीक्षित यांनी म्हटलं होतं, “आई जन्मदिनाच्या शुभेच्छा! असं म्हणतात की, आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. हे अगदीच खरं आहे. तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्ट, तू शिकवलेले धडे हीच मला तुझ्याकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. तुला चांगलं आरोग्य मिळो आणि तू आनंदी राहो याच सदिच्छा व्यक्त करते.”