राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. १७ मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावर्षी राज्यात सलग दुसऱ्या वर्षी भीषण दुष्काळाचे संकट आहे. १६ जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट आहे. दुष्काळावर शासन उपाय योजत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरून होणार नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला असून हितचिंतकांनी आपला निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ)’मध्ये द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यादिवशी राज्यात कोठेही समारंभ आयोजि न करता दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावरांना चारा पुरविण्यासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. १७ मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2013 at 03:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha cm not to celebrate bday due to the drought situation