मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे येथील ब्लाॅकचे पडसाद शुक्रवारी सकाळच्या सुमारास जाणवले. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या ३६ तासांच्या सीएसएमटी आणि ठाणे येथील ६३ तासांच्या ब्लाॅकने प्रवाशांना प्रचंड विलंबयातना सहन करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच मध्य रेल्वेने शनिवारी सुट्टीकालीन लोकल वेळापत्रक जाहीर केले असून त्यामुळे ५३४ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे येथील ५-६ फलाटांच्या रुंदीकरणाच्या कामानिमित्त गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लाॅक असणार आहे. तर, सीएसएमटी येथे १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून दुपारी १२.३० पर्यंत ब्लाॅक असणार आहे. त्यामुळे शनिवारी मध्य रेल्वेवरील ५३४ लोकल फेऱ्या रद्द करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. परिणामी, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास यातनादायक होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: मुंबई: ‘अभियांत्रिकी’ सत्र ८ आणि ‘बीएमएस’ सत्र २ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

९३० लोकल फेऱ्या रद्द

शुक्रवारी १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. शनिवारी ५३४, तर रविवारी २३५ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३७ आणि रविवारी ३१ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, सर्वाधिक म्हणजे शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या ब्लॉकच्या वेळी सीएसएमटी – वडाळा रोडदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळ्यादरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच अनेक लोकल भायखळ्याऐवजी दादर, परळपर्यंत चालवण्यात येतील. शेकडो लोकल रद्द आणि अंशतः रद्द असल्याने प्रवाशांना प्रवास करताना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: मुंबई: ‘बी.ए.’च्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ४९.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, ५०.६९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

१ जून रोजी अप रेल्वेगाड्या रद्द

पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड – सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, जालना – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे – सीएसएमटी एक्स्प्रेस, जालना – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड – सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, साई नगर शिर्डी – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, हैदराबाद – सीएसएमटी हुसेन नगर एक्स्प्रेस, कोल्हापूर – सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड – सीएसएमटी राज्य राणी एक्स्प्रेस, जबलपूर – सीएसएमटी गरीब रथ एक्स्प्रेस

हेही वाचा: एमएमआरडीएचा पावसाळी नियंत्रण कक्ष आजपासून कार्यान्वित

१ जून रोजी डाऊन रेल्वेगाड्या रद्द

सीएसएमटी – नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी – धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, सीएसएमटी – नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी – अमरावती एक्स्प्रेस, सीएसएमटी – नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी – हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस