मकर संक्रातीच्या सणानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीतर्फे बोरिवलीतील महिलांसाठी ‘महासंक्रांत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्टार प्रवाह’च्या कुटुंबातील कल्याणी, मुक्ता, सब-इन्स्पेक्टर प्रेरणा सरदेसाई आणि कॉन्स्टेबल मारूती जगदाळे यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ आणि तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम रंगला. या सोहळ्याबरोबरच प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी संक्रांतीच्या दिवशी वाहिनीवर ‘महाएपिसोड्स’ दाखवण्यात येणार आहेत.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या कलाकारांचा प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून देणारा ‘महासंक्रांत’ हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रंगला होता. या कार्यक्रमाला महिलांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. हळदी-कुंकू समारंभानंतर कलाकारांनी तेथे आलेल्या महिलांशी संवाद साधला. याशिवाय, महिलांसाठी फन गेम्सचेही आयोजन करण्यात आले होते. ‘स्टार प्रवाह’च्या नायिका कल्याणी आणि मुक्ता यांनी तर लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरत उपस्थित महिलांनाही आपल्या बहारदार नृत्यात सामील करून घेतले.
संक्रांतीच्या निमित्ताने घरी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी खास ‘महाएपिसोड्स’चे आयोजन वाहिनीने केले आहे. १५ जानेवारीला रात्री ८ वाजता ‘रुंजी’ आणि रात्री ९ वाजता ‘देवयानी’ या दोन मालिकांचे खास महाएपिसोड्स दाखवण्यात येणार आहेत. ९०० भाग पूर्ण करणाऱ्या ‘देवयानी’ मालिकेत देवयानी आणि एक्का यांची जोडी तर ‘रुंजी’मध्ये रिशी आणि रुंजीची जोडी फुलू लागली आहे. मात्र, ऐन संक्रोंतीच्या सणादिवशी या जोडय़ांच्या आयुष्यावरही संक्रांत येणार नाही ना.. ‘रुंजी’ आणि ‘देवयानी’ यांच्या आयुष्यातील हा संक्रांतीचा क्षण ‘स्टार प्रवाह’च्या प्रेक्षकांना ‘महाएपिसोड्स’मधून पहायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा