मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग ॲप संबंधित १५ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बॉलिवूड अभिनेता साहिल खानला नुकतीच छत्तीसगड येथून अटक केली. महादेव ॲपचे द लायन बुक नावाचे अन्य एक ॲप आहे. हे ॲप दुबईतील हॉटेल व्यावसायिकाशी संबंधित असून साहिल खानची त्याच्यासोबत भागिदारी आहे. अटक टाळण्यासाठी साहिल खान दोन दिवस पाच राज्यांत पळत होता. पण सुमारे १८०० किलोमीटर दूर पाठलाग करून पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या या बेटिंग ॲप वर्तुळाची वार्षिक उलाढाल हजारो कोटींची आहे.

उच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी साहिल खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने तत्काळ चालकाला बोलावले आणि मुंबईतून पळ काढला. त्याने पहिला मुक्काम गोव्यात केला. तेथे काही तास थांबल्यानंतर तो कर्नाटकला रवाला झाला. त्यावेळी पोलिसांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो मोबाइल उचलत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. साहिलने कर्नाटकात काही तास घालवले, थोडी विश्रांती घेतली आणि नंतर तो तेलंगणातील हैदराबादला रवाना झाला. तेथे तो हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी त्याने मोबाइल बंद केला. अखेर पोलिसांनी त्याच्या चालकाची माहिती काढली आणि त्याद्वारे त्याच्या ठिकाणाची माहिती घेतली. साहिलच्या लक्षात येताच तो छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेच्या दिशेने निघाला. दरम्यान, तो गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर्ती भागातून नंतर अनेक नक्षलग्रस्त जिल्ह्यांतही गेला. तो जबलपूर येथील आराध्या हॉटेलमध्ये राहिला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी १८०० किलोमीटर प्रवास करणाऱ्या साहिलपर्यंत अखेर पोलीस पोहोचले.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
cyber crime
सायबर सुरक्षाकवच
kanguva actor surya and jyothika in shaitan
३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप

हेही वाचा – संपूर्ण मे महिना कोकणातील नेत्रावती एक्स्प्रेस रखडणार, कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक

ऑनलाइन बेटिंग व्यवसायाची उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात आहे. हे ॲप युएईमधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे. ॲपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, यूएई व श्रीलंका येथून सेवा केंद्र (कॉल सेंटर) चालवले जात असल्याचा ईडीला संशय आहे. व्हॉट्सॲपद्वारे या ॲपची जाहिरात केली जाते. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ती माहिती कॉल सेंटरपर्यंत पोहोचते. तेथून सर्व माहिती दिल्यावर संबंधित व्यक्तीचे आभासी खाते उघडण्यात येते. त्यात रक्कम भरून ॲपद्वारे बेटिंग केले जाते. या सर्व यंत्रणेमागे देशभरात चार ते पाच हजार पॅनल ऑपरेटर कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक ऑपरेटर छत्तीसगड, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत. प्रत्येक ऑपरेटर किमान २०० ग्राहक सांभाळतो. या सर्व व्यवहारसाठी ऑपरेटरना ३० टक्के रक्कम मिळते. उर्वरीत रक्कम पुढे पाठवली जाते. आठवड्यातील सर्व व्यवहार प्रत्येक सोमवारी बंद केले जातात. या ॲपद्वारे दररोज सुमारे २०० कोटी रुपयांचा फायदा होत असल्याचा अंदाज आहे. महादेव अपचे प्रवर्तक सुमारे ४ ते ५ ॲप चालवत असल्याचा ईडीला संशय आहे. पाकिस्तानातही या टोळीचे बेटिंग ॲप सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती.

हे प्रकरण झारखंड राज्यापुरती मर्यादीत होते. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी भूवया उंचावल्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तांत्रिक पुराव्यानुसार, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे दिले गेले आणि ४२ कोटी रुपये हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आले. या तारांकीत कलाकारांना बहुतांश रक्कम रोखीने देण्यात आली आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यामातून या कलाकारांशी संपर्क साधण्यात आला होता. अनेक कलाकारांनी ८० टक्के रक्कम रोखीने व २० टक्के धनादेशाद्वारे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची सर्व माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कलाकारांना मिळालेली रोख रक्कम हवाला नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीकडे या लग्नाच्या चित्रफीती आहेत. याप्रकरणी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीशी संंबधित व्यक्तींचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. त्यात या कलाकारांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती ईडीला मिळाली आहे.

हेही वाचा – मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी

साहिल खान समाज माध्यमावर महादेव बेटिंग ॲपशी संबंधित द लायन बुक नावाच्या ॲपची जाहिरात करताना दिसला. तो दुबईमधील ॲपच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाला होता. या ॲपचा प्रचंड नफा पाहून साहिल देखील या ॲपमध्ये भागीदार झाला. पण हे ॲप बेकायदेशिररित्या चालवण्यात येत होते. ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात सप्टेंबर महिन्यात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. पोपट या अंगडीयाची झडती घेण्यात आली त्यात दोन कोटी ३७ लाख रुपयांची बेहिशेबी रोख जप्त करण्यात आली. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३ कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले. गोविंद केडियाच्या मदतीने विकास चपरिया यांनी त्यांच्या संस्थांद्वारे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. २३६ कोटी ३० लाखांच्या गुंतवणूक ईडीने गोठवली आहे. तसेच केडियाच्या डीमॅट होल्डिंग्समधील १६० कोटी रुपयांची मालमत्ता पीएमएलए कायद्या २००२ अंतर्गत ईडीने गोठवली आहे. केडियाच्या परिसरात केलेल्या झडतीत १८ लाख रुपयांचे भारतीय चलन, १३ कोटी रुपयांचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली होती.

Story img Loader