अनिश पाटील

मुंबई : पाच हजार कोटींची उलाढाल असलेल्या महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर अंडरवल्र्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटिंग अ‍ॅप चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पाकिस्तानात अ‍ॅप तयार करण्यासाठीची रक्कम भारतातून हवालामार्फत पाठवण्यात आली असून त्याबाबत सध्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करत आहे. चंद्राकरच्या लग्नात भारतातील चित्रपटसृष्टीतील अभिनेते व गायकांप्रमाणे पाकिस्तानातूनही काही जण सहभागी झाले होते. ते पाकिस्तानातील बेटिंग अ‍ॅपशी संबंधित असल्याचा संशय आहे.

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

२०२१ मध्ये महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तक सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उप्पलने अंडरवल्र्डच्या मदतीने पाकिस्तानात बेटिंग अ‍ॅप सुरू केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. पाकिस्तानात स्थानिक नावाने सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपने गेल्या दोन वर्षांत मोठी कमाई केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अंडरवल्र्डकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने चंद्राकरकडे खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी चंद्राकरने त्याला धुडकावून लावले होते. या संपूर्ण प्रकरणात मदत करणारा दाऊद इब्राहिम असल्याचा संशय ईडीला आहे. त्याबाबत सध्या सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा >>>गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त; सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयास्पद हालचालींवर करडी नजर

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळय़ासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या विवाह सोहळय़ात सादरीकरण करण्यासाठी अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत, भाग्यश्री, कीर्ती खरबंदा, एली अवराम हे १४ चित्रपट कलाकार सहभागी झाले होते. या कलाकारांशिवाय पाकिस्तानात सुरू करण्यात आलेल्या बेटिंग अॅपशी संबंधितही उपस्थित होते. ते पाकिस्तानातील सट्टेबाज असल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान भारतीय कलाकारांनी या लग्न सोहळय़ात कार्यक्रम सादर करण्यासाठी बहुतांश रक्कम रोखीने घेतली आहे. काही जणांनी ८० टक्के रक्कम रोखीने व २० टक्के धनादेशाद्वारे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची सर्व माहिती ईडीच्या हाती लागली आहे.

३०० कोटींची गुंतवणूक

पाकिस्तानातील बेटिंग अ‍ॅपसाठी ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून पाकिस्तानातील नफ्यातील ३० टक्के अंडरवल्र्डला व उर्वरित ७० टक्के चंद्राकर व साथीदारांना मिळत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील गुंतवणूक भारतीय बेटिंग अ‍ॅपच्या नफ्यातून उभारण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ही रक्कम पाकिस्तानात नेण्यासाठी कोणत्या हवाला नेटवर्कचा वापर झाला, याबाबत ईडी तपास करत आहे. भारतातील या अॅपची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांची आहे. पाकिस्तानातील उलाढालीबाबत सध्या ईडी तपास करत आहे.