मुंबई : वैविध्यपूर्ण विषय आणि वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक बाजूंनी दर्जेदार असणारा नाट्यानुभव घेण्यासाठी मराठी प्रेक्षक नाट्यगृहात हमखास गर्दी करतात आणि नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी क्षणार्धात लागते. मात्र संपूर्ण नाट्यगृह आरक्षित असूनही दोन्ही मराठी नाटकांच्या प्रयोगांना मिळून फक्त ५० ते ६० प्रेक्षक उपस्थित होते. मुलुंड येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिराच्या आसपास वैयक्तिक कार्यक्रमासाठी वाहनतळाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे एका व्यक्तीने चक्क नाट्यगृहातील वाहनतळाचा वापर करण्यासाठी नाट्यगृहच आरक्षित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येथे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी एका व्यक्तीचा वैयक्तिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला शेकडो माणसे येणार असल्यामुळे वाहनतळाची आवश्यकता होती. मात्र कार्यक्रमस्थळाच्या आसपास कुठेही वाहनतळ उपलब्ध होत नव्हते. नाट्यमंदिराच्या वाहनतळाचा पर्याय उपलब्ध होता, मात्र त्याठिकाणी दोन मराठी नाटकांचे प्रयोग होणार असल्यामुळे नाट्यगृह आरक्षित होते. व्यक्तीने दोन्ही नाट्यसंस्थेच्या लोकांना गाठत प्रजासत्ताक दिनी कंत्राटी स्वरूपात नाटकाचे प्रयोगाची मागणी केली. नाट्यसंस्थांना नाट्यगृहाच्या भाड्यासह प्रयोगाचे योग्य पैसेही देत नाट्यगृहच आरक्षित केले. मात्र यासंबंधी नाट्यसंस्थांना अंधारात ठेवले.

Story img Loader