67th Mahaparinirvan Diwas Updates, 06 December 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आज झालं होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.
६ डिसेंबर हाच तो दिवस होता, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज सकाळपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जमले आहेत. तसंच आंबेडकरवादी विचारांचेही लोक जमले असून राज्य सरकारने विशेष कार्यक्रमाचं आयोजनही केलं आहे. महापरीनिर्वाण दिन आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे सगळे अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Mahaparinirvan Diwas 2023 Chaityabhoomi Live Updates : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून आंबेडकरी अनुयायी दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी दाखल होतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सरकारने राहण्याची व स्वच्छतागृहाची अतिशय उत्तम व्यवस्था केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दादर स्थानकातून चैत्यभूमीकडे जाणारा मार्ग योग्यप्रकारे समजण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत. तसेच रेल्वे पोलिसासह आरपीएफ, गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा दादर स्थानकात तैनात केला आहे. पादचारी पुलांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे अनुयायांचा प्रवास शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत होत आहे.
मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्यावतीने दादर स्थानकातील मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम यांना जोडणारा मोठा पादचारी पूल व फलाट क्रमांक ६ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतुन रेल्वे स्थानकात येणारे अनुयायी व प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहे. या पुलावरून फक्त लोकल आणि रेल्वेगाड्यांनी दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्याची तसेच दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्याची मुभा आहे. या स्थानकांत असलेला महापालिका पूल स्थानकाबाहेरील पूर्व-पश्चिम शहरहद्दीतून दादर रेल्वे स्थानक येथे फलाटावर येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांना वापरता येईल.
मध्य मोठ्या पादचारी पुलाच्या उत्तरेकडील मध्य रेल्वेवरील पादचारी पूल हा दादर मध्य रेल्वे स्थानकातील फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांना फलाट बदलण्याकरीता व पूर्व बाजूस जाण्याकरीता खुला राहील. तसेच दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वरील स्कायवॉक लगतचे द्वार क्रमांक २ व ३ वगळता सर्व प्रवेशद्वारे ही रेल्वे प्रवासी व अनुयायी यांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिसांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे दादर स्थानकात सुरक्षा व्यवस्थेसह, विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. दादरवरून चैत्यभूमीकडे जाण्यासाठी योग्य मार्ग तयार केले आहेत. जागोजागी सूचना फलक लावले आहेत. उद्घोषणेद्वारे प्रवासी आणि अनुयायांना वारंवार माहिती दिली जात आहे. – डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई</p>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुता ही जी भगवान गौतम बुद्धांनी सांगितेलली तत्वे आहेत, या तत्त्वांच्या आधारे संविधान तयार केलं. म्हणूनच जगामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी आपल्या जीवनात अर्थतज्ज्ञ, मजूर मंत्री, पाटबंधारे मंत्री म्हणून काम केलं. प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल ठरलं आहे. म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. तज्ज्ञांचे विचार जिथे संपतात तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे. म्हणूनच आज देशाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे – देवेंद्र फडणवीस</p>
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पहाटे ५ वाजता वाशिम शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या पेटवत आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते.
डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज आहे. या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. त्याचप्रमाणे दादरमध्ये सरकारने विशेष कार्यक्रमाचंही आयोजन केलं आहे.
https://x.com/mybmc/status/1732222500057354358?t=BVlXeou9u_4pw3EfEu1l1w&s=08
६ डिसेंबर हाच तो दिवस होता, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज सकाळपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जमले आहेत. तसंच आंबेडकरवादी विचारांचेही लोक जमले असून राज्य सरकारने विशेष कार्यक्रमाचं आयोजनही केलं आहे.