“मुंबईत भाजपा आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या राजस्थानातील कंबलवाले बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

“अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा”

यावर बोलताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “मला सोशल मीडियावरील एक व्हिडीओ अनेकांनी पाठवला. त्यात राजस्थानमधून आलेला कंबलवाले बाबा नावाचा बाबा आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात विकलांग लोकांवर उपचार करताना दिसत आहे. ते लोक बरे झालेत असं दाखवलं जातंय. महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी कायदा लागू आहे. यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा, चमत्कार करण्याचा दावा करणं हा कायद्याने गुन्हा आहे.”

Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

व्हिडीओ पाहा :

“कंबलवाले बाबाची बुवाबाजी बंद करावी”

“त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आम्ही पोलिसांना असं आवाहन करतो की, त्यांनी या कंबलवाले बाबाला तत्काळ अटक करावी. आमदार राम कदम, पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते साक्षीदार म्हणून पोलिसांच्या मदतीला येऊ शकतील. त्यामुळे पोलिसांनी त्वरित राजस्थानमधून आलेल्या या कंबलवाले बाबाची बुवाबाजी बंद करावी,” अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी अंनिसच्या वतीने केली.

“विकलांग लोकांवर घोंगडे टाकून तथाकथित उपचार”

अंनिसने म्हटलं, “कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर घोंगडे टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारीही उपस्थित असलेले दिसतात.”

हेही वाचा : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश…”

“भोंदू कंबलबाबावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करा”

“गेली १० वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास १००० पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा आणि पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली.