मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता कुठे रंगात येऊ लागणार असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काही ठिकाणी उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. तर अल्पसंख्यांकांची संख्या जास्त मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वाट्याला गेल्यामुळे अल्पसंख्यांक इच्छुक उमेदवारही नाराज झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर आता प्रत्येक मतदारसंघाचे साधारण चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाराजांची संख्याही वाढली आहे. शीव कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी कॉंग्रेसची साथ सोडली. गेली ४४ वर्ष कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवी राजा यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आता कॉंग्रेसमधील नाराज कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. वडाळ्यामधील माजी नगरसेवक सुफीयान वणू यांनी समाज माध्यमांवर ध्वनिचित्रफित टाकून आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली मुंबईतून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शीव कोळीवाडा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
youth upload selfie video before commit suicide
मृत्यूपूर्वी चित्रफीत अपलोड करून तरूणाची आत्महत्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
young man killed due to dispute over bursting firecrackers
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>> Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

रवी राजा यांच्या पक्ष सोडण्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे, याचा शीव कोळीवाड्यातील निवडणुकीवर परिणाम होऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करण्यात येत आहे. निवडणुकीच्या वेळी असे प्रकार घडत असतात. आम्ही कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत, निवडणुकीपूर्वी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक लढवतील, असा विश्वास मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी संदीप शुक्ला यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ

ज्या मतदारसंघात कॉंंग्रेसला जास्त मते मिळत होती, जे मतदारसंघ कॉंग्रेसचे बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते, ज्या मतदारसंघात अल्पसंख्यांक मतदार जास्त आहेत असे मतदार संघ शिवसेनेला (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) यांना सोडले आहेत, एक लाखहून अधिक अल्पसंख्यांक असलेल्या जागा शिवसेनेला जातात, हा योगायोग समजावा का, असा सवाल सुफियान वणू यांनी केला आहे. गोवंडी, अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व, कुर्ला, कलिना, भायखळा, वर्सोवा हे मतदारसंघ कॉंग्रेसकडून हिरावले आहेत. या भागात कॉंग्रेसचे जाळे विस्तारू नये असा प्रयत्न यामागे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कॉंग्रेस मुंबईत वाढू नये म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

Story img Loader