मुंबई : साम-दाम-दंड-भेद असे सारे पर्याय वापरूनही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाड्यांपुढे विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे राहिले आहे. मित्रपक्षांच्या उमेदवाराविरोधात अनेक जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. गोपाळ शेट्टी यांच्या माघारीमुळे भाजपने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाच्या बंडखोरांनी माघार न घेतल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. माहीममध्ये शिवसेनेच्या (शिंदे) सदा सरवणकर यांनीही मनसेच्या अमित ठाकरेंना आव्हान कायम ठेवले आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ, अक्कलकुव्यात हीना गावित यांचे बंडही शमलेले नाही.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३ वाजता संपली. तत्पूर्वी बंडखोरांनी माघार घ्यावी म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेतृत्वाने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेतली असली, तरी बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोर ठाम राहिले. परिणामी सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना बंडखोरीचा फटका बसला आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत वेळेत निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र मलिक यांनी माघार न घेतल्याने आता शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असतील. नांदगावमध्ये समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून लढत असल्याने तेथे शिवसेनेचे (शिंदे) विद्यामान आमदार सुहास कांदे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. घनसावंगीमधून शिवाजी चोथे, बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टीमध्ये भीमराव धोंडे, रमेश आडसकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले. नांदेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली. लातूर व धाराशिवमध्ये बंडखोरी शमविण्यास नेत्यांना यश मिळाले. जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जरांगे शक्तीच्या आधारे बंडखोरी करू, असे ठरविणाऱ्या बहुतेकांनी अर्ज परत घेतले. आष्टीमध्ये ‘महायुती’त मैत्रीपूर्ण लढत होत असून घनसावंगीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते शिवाजीराव चोथे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याच पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. विजय नहाटा आणि विजय चौगुले या शिंदे समर्थकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने गणेश नाईक व मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यामान आमदारांना बंडखोरीवर मात करावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे) व शेकापमध्ये शेवटच्या क्षणी समझोता झाला. पण उरणमधून शेकापने माघार न घेतल्याने शिवसेनेने अन्य मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार कायम ठेवले.

Shrinivas Pawar Ajit Pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांची आई कोणाच्या बाजूने? उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत कौटुंबिक गोष्टी सांगितल्या; थोरला भाऊ म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
mahavikas aghadi
‘मविआ’त छोट्या पक्षांची बंडखोरी
leopard stuck in a tree in Rajapur, Rajapur leopard, Ratnagiri,
रत्नागिरी : राजापुरात झाडावर अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यास वन विभागाला यश
cji dhananjay chandrchud to deliver inaugural Loksatta lecture today
न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने ‘विचारोत्सवा’ला प्रारंभ; ‘लोकसत्ता लेक्चर’ उपक्रमाची आजपासून सुरुवात
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू

हेही वाचा >>>Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप

२८८ जागांसाठी ४१४० उमेदवार

●एकूण ७९९५ उमेदवारांचे १०,९०५ अर्ज

●पडताळणीनंतर ७०७८ उमेदवार पात्र

●अखेरच्या दिवसापर्यंत२९३८ उमेदवारांची माघार

●माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार

●सर्वांत कमी, पाच उमेदवार महाड मतदारसंघात

●जरांगे यांच्या माघारीनंतर भोकर मतदारसंघातून १४० पैकी ११५ उमेदवारांचे अर्ज मागे

●एकूण ७९९५ उमेदवारांचे १०,९०५ अर्ज

●पडताळणीनंतर ७०७८ उमेदवार पात्र

●अखेरच्या दिवसापर्यंत२९३८ उमेदवारांची माघार

●माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार

●सर्वांत कमी, पाच उमेदवार महाड मतदारसंघात

●जरांगे यांच्या माघारीनंतर भोकर मतदारसंघातून १४० पैकी ११५ उमेदवारांचे अर्ज मागे

माहीमचे माघार‘नाट्य

●माहीम मतदारसंघात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना महायुतीने पाठिंबा द्यावा यासाठी बरेच प्रयत्न झाले.

●शिवसेनेचे (शिंदे) सदा सरवणकर यांनी माघार घेण्याची तयारीही केली होती. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांनी लढण्याचा निर्धार केला.

●परिणामी या मतदारसंघात आता शिवसेना (ठाकरे), मनसे आणि शिवसेना (शिंदे) अशी तिंरगी लढत होईल. याचा फायदा कोणाला होणार, हे निकालावेळी स्पष्ट होईल.