मुंबई : भाजपचा बालेकिल्ला असलेला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही भाजपने आपले वर्चस्व राखले. दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड या सहापैकी पाच मतदारसंघांत शिवसेना – भाजप महायुतीने विजय मिळविला. केवळ मालाड पश्चिम या मतदारसंघातून कॉंग्रेसचे अस्लम शेख चौथ्यांदा विजयी झाले असून भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना पराभव पत्करावा लागला.

मनिषा चौधरी यांची हॅट्रीक

दहिसर मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांना प्रचारात कडवी झुंज दिली होती. मात्र त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मनिषा चौधरी मतमोजणीत आघाडीवर होत्या. या मतदारसंघोत एकूण एक लाख ६० हजार मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ९८ हजार ५८७ मते मनिषा चौधरी यांना, तर ५४ हजार २५८ मते घोसाळकर यांना मिळाली. घोसाळकर यांच्या मुलाच्या हत्येमुळे त्यांनी सहानुभूती मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

मागाठाणे मतदारसंघात प्रकाश सुर्वे यांची हॅट्रिक

मराठी बहुल अशा मागाठाणे मतदारसंघात यावेळी शिवसेनेच्या दोन गटात लढत होती. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उदेश पाटेकर यांच्यात लढत झाली. त्यात सुर्वे यांनी मोठा विजय मिळवला. सुर्वे यांना तब्बल एक लाखाहून अधिक मते मिळाली. सुर्वे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. उदेश पाटेकर यांना ४७ हजार मते मिळाली. सुर्वे यांच्या विजयामुळे शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ताकद मिळाली आहे.

हेही वाचा >>> मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची सरशी, वरुण सरदेसाई ११३६५ मतांनी विजयी

बोरिवलीत भाजपला मोठे मताधिक्य

बोरिवलीकरांनी परंपरेप्रमाणे भाजपला मोठे मताधिक्य दिले. भाजपचे नवखे उमेदवार संजय उपाध्याय यांना एक लाख ३९ हजाराहून अधिक मते मिळाली. तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संजय भोसले यांचा तब्बल एक लाख २५७ मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर झालेल्या नाराजी नाट्यानंतरही या मतदारसंघात भाजपने आपले मताधिक्य राखले आहे.

हेही वाचा >>> Chembur Assembly Election Results 2024 : प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली ; चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी

कांदिवली पूर्वमध्ये भातखळकर यांची हॅट्रीक

कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल सव्वा लाख मते मिळाली आहेत. ८३ हजाराच्या मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. त्यांनी कॉंग्रेसच्या कालू बुधेलिया यांना पराजित केले.

चारकोप मध्ये योगेश सागर

चारकोप विधानसभा मतदारसंघात भाजपचे योगेश सागर यांनाही १ लाख २७ हजाराहून अधिक मते मिळाली. त्यांनी कॉंग्रेसच्या यशवंत सिंह यांचा तब्बल ९१ हजार मतांनी पराभव केला.

मालाडमध्ये कॉंग्रेसच मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघावर मात्र भाजपला विजय मिळवता आला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांचा पराभव केला. शेख या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना ९८ हजार मते मिळाली. शेलार यांना केवळ सहा हजार मतांनी हार पत्करावी लागली. धारावीच्या अपात्र रहिवाशांना मालाडमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा मालाडमधील रहिवाशांनी विरोध केला होता. तो विरोध भाजपला भोवला.

Story img Loader