मुंबई : मुंबईतील आठ रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला. रेल्वेस्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून स्थानिक मराठी नावे देण्याची मागणी बरीच वर्षे करण्यात येत होती. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने आता विधिमंडळात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला शिफारस करण्याची भूमिका घेतली आहे.

मध्य रेल्वेच्या करीरोड रेल्वेस्थानकाचे लालबाग, तर सँडहर्स्ट रेल्वेस्थानकाचे डोंगरी, पश्चिम रेल्वेवरील मरीनलाईन्स स्थानकाचे मुंबादेवी व चर्नीरोडचे गिरगाव आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीनचे काळाचौकी, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडला.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा >>> बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत

यावेळी दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी रेल्वेस्थानक करण्याची मागणी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केली. तर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला २०२१ मध्ये पाठविण्यात आला होता. त्याची सद्यास्थिती काय आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. महायुती सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने मान्यता दिल्यापासून या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. पुढील प्रक्रिया काय असेल ? विधिमंडळाच्या उभय सभागृहाने आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा केलेला ठराव केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे सादर केला जाईल. गृह विभागाकडून विविध खात्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते. रेल्वे स्थानकांची नावे बदलायची असल्याने रेल्वे खात्याची मंजूरी आवश्यक असेल. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी स्थानक असे नामकरण करण्यात आले होते.

Story img Loader