राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद विकोपाला पोहोचला होता. विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्याने सत्ताधारी आमदारांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आज आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारं बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

“मंत्रीपद गेलं तरी मला काही फरक पडत नाही”, गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

Devendra fadnavis
नाराज, इच्छुकांची ‘सागर’वर भाऊगर्दी; पहिल्या यादीत नाव नसल्याने चिंता व्यक्त, बंडखोरी न करण्याचे फडणवीस यांचे आवाहन
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Surrender of Naxal couple Gadchiroli, Naxal couple, Odisha,
जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण; महाराष्ट्रासह ओडिशात हिंसक कारवायांत सहभाग
Manoj Jarange, Parivartan Mahashakt,
मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीत यावे, संभाजीराजे भोसले यांची भूमिका
Manoj Jarange Patil, applications from more than 800 aspirants, assembly elections 2024, marathwada
मनोज जरांगे यांच्याकडे ८०० जणांचे अर्ज, निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात पुन्हा पक्षांतराच्या हालचाली
Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
Devendra Fadnavis Answer to Sharad Pawar
Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, “शरद पवारांना इतक्या गंभीर घटनेनंतरही खुर्ची दिसते…”
dasara melava
शब्दास्त्रांचे शिलांगण? शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे यांच्या मेळाव्यांतून प्रचाराचे रणशिंग

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं असून, हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. तसंच ‘युवराजांची दिशा चुकली’ अशी टीकाही करण्यात आली आहे.

बॅनरवर काय लिहिलं आहे –

या बॅनरमधून आदित्य ठाकरेंवर काही गंभीर आरोप आणि टीका करण्यात आली आहे. २०१४ ला १५१ चा हट्टा धरुन युती बुडवली. २०११ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असा आरोप आदित्य ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसंच घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली अशी टीका केली आहे. पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असंही त्यात म्हटलं आहे. सत्तेत असताना शिवसैनिकांना तडीपार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

शिंदे गटाचा इशारा

“त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोनच दिवस घोषणा दिल्या असून, त्यांच्या वर्मी लागलं आहे. कोण काही विचारतंय का याची आम्ही वाट पाहत होतो, पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण काही केल्यास आम्ही हात बांधून बसणार नाही. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही. आम्हाला कोणाच्या घरापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तुम्ही शिस्त पाळल्यास, आम्हीदेखील पाळू, उगाच आम्ही डिवचणार नाही,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे.