विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी त्यांनी केलेल्या एका गोष्टीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राणीबागेसंबंधी केलेल्या ‘त्या’ ट्वीटनंतर नितेश राणे शिवसेनेची माफी मागण्यास तयार; पण ठेवलीये एक अट

भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

नितेश राणेंचं स्पष्टीकरण

नितेश राणे यांना एबीपीशी बोलताना यासंबंधी विचारण्यात आलं असता म्हणाले की, “मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याव म्याव करणारी शिवसेना आहे”. यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला आता शिवसेनेच्या आक्षेपाची सवय झाली आहे”.

आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकीवरुन विधानसभेत आरोप-प्रत्यारोप

आमदार सुनील प्रभू यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकीसंदर्भात भूमिका मांडली. यावर अखेर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर निवेदन दिलं. “ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

८ डिसेंबरला काय घडलं?

आरोपीने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session bjp nitesh rane on shivsena aditya thackeray sgy