हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात मदत करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील सात अधिकारी  गुरुवारी रात्री हैदराबादला रवाना झाले होते.
 या स्फोटामागे इंडियन मुजाहिदिन संघटनेचा हात असल्याचा संशय असून यादृष्टीने तपास करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी पोलीस पथक रवाना झाले आहे. या पथकात एकूण सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी दिल्लीच्या विशेष पथकाने  इंडियन मुजाहिदिनच्या मकबूल नावाच्या दहशतवाद्याला नांदेड येथून अटक केली होती. तो सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Story img Loader