संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात १४ जणांचा मृ्त्यू झाला तर अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यातील दुर्घटनेला १६ नोव्हेंबर रोजी तब्बल आठ महिने होत आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्यात सांगण्यात आले होते. नंतर आणखी एक महिना मुदतवाढ देण्यात आली, मात्र त्यालाही सहा महिने उलटले असून अद्याप नितीन करीर यांच्या चौकशी समितीने अहवाल दिलेला नाही. त्यामुळे या दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण? तसेच अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करताना कोणती दक्षता घ्यावी, हे सारेच गुलदत्त्यात आहे.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाल्यानंतर खारघर येथे मोठा कार्यक्रम करण्यात आला. काही एकरात पसरलेल्या जागेवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी भव्य व्यासपीठ तसेच आकर्षक सजावट करण्यात आली होती. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते. त्या अनुषंगाने शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात लाखो श्री सदस्यांना भर उन्हात तब्बल सहा-तास बसावे लागले होते. परिणामी उष्माघाताच्या त्रासामुळे अनेक श्री सदस्य बेशुद्ध होऊ लागले होते. त्यात कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. त्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास पुढचे दीड -दोन तास लागले. उपस्थित जनसमुदायाला पिण्याचे पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती. त्यात बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे चालत जाणे देखील श्री सदस्यांना कठीण झाले होते. जी सार्वजनिक वाहने श्री सदस्यांना नेण्यासाठी ठेवण्यात आली होती, ती वाहने बराच वेळ ट्रॅफिक मध्ये अडकून पडल्याने अनेक श्री सदस्यांना भर उन्हात तीन चार किलोमीटर चालणे भाग पडले. उष्माघातामुळे त्रास असह्य झाल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालय, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, खारघर येथील मेडीकोव्हर रुग्णालय व खारघर येथील टाटाच्या ॲट्रॅक्ट रुग्णालयात मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत १४ श्री सदस्यांना प्राण गमवावे लागल्याने या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. प्रचंड टीका सरकारवर होऊ लागली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अखेर महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली व एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. दरम्यान नितीन करीर यांच्या चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत जूनमध्ये संपुष्टात आली. मात्र आजपर्यंत नितीन करीर समितीने आपला अहवाल सादर केला नाही. नितीन करीर यांच्याशी भ्रमध्वनी वरून तसेच लघुसंदेशाध्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

विरोधकांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. शिंदे-फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देत याप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कारवाईची मागणी केली तर काँग्रेसने या प्रकरणी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तसेच चौकशीची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. अजित पवार यांनीही निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समितीची मागणी केली. राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. वातावरण उन्हाने तापलेले असताना सकाळी इतक्या लोकांना बोलावण्याऐवजी राजभवनावर हा कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. सकाळपेक्षा संध्याकाळी कार्यक्रम झाला असता तरीदेखील प्रसंग टाळता आला असता असे राज ठाकरे म्हणाले.

ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचे आहे, अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली. या घटनेचं कोणीही राजकारण करू नये,असे आवाहन त्यांनी केलं.

हे ही वाचा >> मी सध्या कुठंच नाही..पण सगळीकडंच आहे..; शरद पवारांचे सूचक विधान

उष्माघातासदर्भात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. आरोग्य विभागाने त्या मार्चमध्येच जाहीर केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे उष्माघाताने मोठ्या प्रमाणात मृ्त्यू झाल्यानंतर एका विशेष समितीची स्थापना करून उष्माघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे तशीच कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली होती. खारघर कार्यक्रमाच्या आयोजनात आयोजकांनी तसेच शासनातील संबंधितांनी आरोग्य विभागाला नेमक्या कोणत्या टप्प्यात समावून घेतले होते. त्यांच्या सूचनांचे पालन झाले होते का तसेच आरोग्य विभागाच्या उष्माघाताबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले होते का यासह या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे तसेच भविष्यात असे कार्यक्रम करताना काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत नितीन करीर यांचा अहवाल अपेक्षित होता. मात्र आज या घटनेला तब्बल आठ महिने झाल्यानंतरही वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी अहवाल सादर केलेला नाही तसेच विरोधी पक्षातील कोणीही आता या विषयावर बोलताना दिसत नाहीत.

Story img Loader