मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना मानसिक नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. समुपदेशानासाठी जाहीर केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर नैराश्य, मानसिक तणाव आदी समस्यांऐवजी तांत्रिक प्रश्नांबाबत अधिक विचारणा होत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या ‘टेलिमानस’ या हेल्पलाईन क्रमांकावरही विद्यार्थ्यांकडून मानसिक तणावाबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये परीक्षेनंतर घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: धावत्या लोकलमध्ये महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना अटक

दहावी व बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली जाण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना मानसिक नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. त्यासाठी राज्य मंडळाने १० तज्ज्ञ समुपदेशकांचे दूरध्वनी क्रमांक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या समुपदेशकांना येणाऱ्या दूरध्वनीमध्ये निकालानंतर येणाऱ्या नैराश्य व मानसिक ताण – तणावासंदर्भात दूरध्वीन येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. प्रत्येक समुपदेशकाला येणाऱ्या दूरध्वनीपैकी ५ ते १० टक्के प्रमाण हे नैराश्य व मानसिक ताण – तणावाबाबतचे आहेत, तर उर्वरित सर्व दूरध्वनी तांत्रिक प्रश्नांबाबत म्हणजेच पुनर्परीक्षेचा अर्ज कसा भरायचा ?, पुनर्मूल्यांकनाचा अर्ज कसा भरायचा ? दहावीनंतर पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, करिअरच्या अनुषंगाने बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा, असे प्रश्न समुपदेशकांना विचारण्यात येत आहेत. दरम्यान, परीक्षेपूर्वी परीक्षेच्या तणावाखाली असल्याने अभ्यास कसा करावा, कोणते प्रश्न परीक्षेला येतील, असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत होते. मात्र निकालानंतर मानसिक तणावाबाबतच्या समस्यांच्या प्रश्नामध्ये घट झाल्याचे समुपदेशकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> हिवताप, डेंग्यूमुक्त मुंबईसाठी कृती आराखडा तयार करणार; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश

टेलिमानसच्या दूरध्वनीमध्येही घट दहावी, बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली होते. परीक्षेपूर्वी साधारणपणे ३० ते ३५ टक्के दूरध्वनी परीक्षेसंदर्भातील विचारणा करण्यासाठी येत होते. त्यामुळे निकालानंतर कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्य व चिंतीत असलेल्या विद्यार्थ्यांचे दूरध्वीन अधिक येण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या दूरध्वनीचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे टेलिमानसच्या समुपदेशकाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra board launched online counseling service to help students overcome mental depression mumbai print news zws