मुंबई : राज्यात उद्याोगवाढीसाठी आता नवीन औद्याोगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धोरणानुसार ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक तसेच ५० लाख रोजगार निर्मितीचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. या उत्पादन तसेच निर्यात प्रोत्साहन धोरणाचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात उद्याोग विभागासाठी १,०२१ कोटी, कामगार विभागाला १७१ कोटी, वस्त्रोद्याोग विभागाला ७७४ कोटी, तर कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता विभागाला ८०७ कोटी रुपये तरतूद केली आहे. राज्यातील उद्याोग बाहेर जात असल्याची टीका सरकारवर होत असताना सरकारने विविध धोरणांद्वारे उद्याोगवाढीचा संकल्प सोडला आहे.
उद्याोग क्षेत्रासाठी काय?
● औद्याोगिक धोरणाबरोबरच अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अॅण्ड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार.
● लॉजिस्टिक धोरणांतर्गत १० हजारांहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार.
● बंगळूरु-मुंबई औद्याोगिक कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्यात येत असून अवर्षणग्रस्त भागात उद्याोग उभारण्यात येणार आहेत.