राज्याचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प १८ मार्चला विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ९ मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. १३ एप्रिलपर्यंत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार १८ मार्च रोजी विधानसभेमध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा होईल. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांपुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव अभिभाषण करतील. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन सरकारच्या भविष्यातील योजनांबद्दलही माहिती देण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा