विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेमध्ये सादर केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारने आत्तापर्यंत केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या स्तरातील लोकांना खूष करण्याचे प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे. अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • राज्याचे स्थूल उत्पन्न ८.५ टक्क्यांनी वाढले
  • व्यवसायकर आकारणीची वेतनमर्यादा ५००० रुपयांवरून ७५०० रुपये
  • कापसावरील कर ५ टक्क्यांवरून २ टक्के
  • ऊस खरेदी कर वर्ष २०१३-१४ करीता माफ
  • लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठी उलाढालीची मर्यादा ६० लाख रुपयांवरून एक कोटी रुपये
  • विमान देखभाल व दुरुस्ती उद्योगास चालना देण्यासाठी विमानाचे सुटे भाग करमुक्त
  • ऐषाराम करमाफीच्या मर्यादेत वाढ, रुपये ७५० ऐवजी आता एक हजारावर करमाफी
  • अॅट्रोसिटी खटल्यांसाठी सहा नवी न्यायालये
  • मनोरुग्णांसाठी व्यवसाय कर रद्द
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा
  • अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
  • पोहे, फुटाण्यावरचा कर माफ
  • राज्यात माता-मृत्यू दरात घट
  • आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरोग्य योजनाची सक्षम अंमलबजावणी
  • आदिवासी भागातील तरुणांना रोजगारासाठी विविध योजना
  • शेतकऱय़ांसाठी वीज कृषी संजीवनी योजना सुरू करणार
  • नवी मुंबई विमानतळासाठी १४ हजार ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • राज्यातील रस्ते विकासासाठी चालू आर्थिक वर्षात दोन हजार ७१५ कोटी रुपये मंजूर
  • पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून एक हजार ५७३ कोटी रुपयांची कामे
  • पायाभूत सुविधांचा जनतेच्या अपेक्षेनुसार विकास
  • परदेशी थेट गुंतवणुकीत राज्य आघाडीवर
  • लघुउद्योजकांना चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विशेष प्रयत्न
  • भंडाऱयातील सौरऊर्जेवीरल प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा
  • राज्यात १० नवीन विकास प्रकल्पांना मान्यता
  • औद्योगिक भागात आता २४ तास वीजपुरवठा
  • अर्थसंकल्पात गडचिरोलीसाठी विशेष तरतूद
  • बालकांची विशेष काळजी घेण्यावर सरकारचा भर
  • राज्यात सिमेंट नाले बांधणार
  • क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी क्रीडा, युवा धोरण चांगल्या पद्धतीने राबवले जाणार 
  • दिल्ली-मुंबई कॉरिडोर प्रकल्पाअंतर्गत औरंगाबादमध्ये १४०६ हेक्टर भूसंपादन
  • ऑनलाईन वीज जोडणी योजना सुरु करणार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget key features