आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प ५ जून रोजी विधिमंडळात मांडला जाणार असून हे अधिवेशन २ जून ते १४ जून या कालावधीत घेतले जाणार आहे. अधिवेशन किमान चार आठवडय़ांचे घेण्यात यावे, अशी विरोधकांची मागणी सत्ताधारी पक्षांनी अमान्य केल्याने त्यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. लोकसभा निवडणुकांमुळे यंदा मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर न करता लेखानुदान मांडण्यात आले होते.  राज्यातील जनतेला दिलासादायक योजना व निर्णयांची खैरात केली जाण्याची शक्यता आहे.७ जुनी आणि ६ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा