विरोधकांची आक्रमक भूमिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकाच्या व त्याच्या पत्नीविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेतून जोपर्यंत कायमची हकालपट्टी केली जात नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा सोमवारी विधानपरिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी घेतला. परिचारक यांच्या कायमस्वरूपी निलंबनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी आणावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

महापालिका व जिल्हा परिषदांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी अत्यंत असभ्य वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. सैनिकांच्या अनेक संघटनांनी याचा निषेधही केला होता. परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असून परिषदेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. नीलम गोऱ्हे, भाई जगताप, हेमंत टकले, शरद रणपिसे, विद्या चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी परिचारक यांची परिषदेतून कायमची हकालपट्टी करण्याची मागणी केली. याबाबतचा ठराव मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात मांडावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली, तर जोपर्यंत ठराव येणार नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली. या प्रकरणी सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. हा सारा गोंधळ सुरू असताना परिचारक मात्र सभागृहात उपस्थित नव्हते.

भाजपला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षाकडून परिचारक यांचे सदस्यत्व निलंबन करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने हा ठराव मंजूर होऊ शकतो.

  • भाजपला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षाकडून परिचारक यांचे सदस्यत्व निलंबन करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. संख्याबळामुळे हा ठराव मंजूर होऊ शकतो.