मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स येथील ३०० एकर जागेवर मध्यवर्ती उद्यान विकसित करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता दिली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात रेसकोर्सची १२० एकर आणि सागरी किनारा मार्गालगतची १८० एकर जागा वापरून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यात येणार आहे.

उद्यान उभारणीसाठी रॉयल वेस्टर्न इंडियाकडील (टर्फ क्लब) १२० एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत होणार आहे. रेसकोर्सची ९१ एकर जागा ३० वर्षे म्हणजे वर्ष २०५३पर्यंत शासकीय भाडेपट्ट्याने टर्फ क्लबकडे राहील. पूर्वी या क्लबकडे रेसकोर्सची सर्व २११ एकर जागा होती. मोकळी जागा अश्व शर्यतीच्या दिवसांव्यतिरिक्त सार्वजनिक वापरासाठी टर्फ क्लबला उपलब्ध राहणार आहे. टर्फ क्लबकडील २०१७ ते २०२३ या कालावधीमधील अतिरिक्त भाडेपट्टीच्या फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टर्फ क्लबव्दारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व क्रीडेत्तर कार्यक्रमांसाठी पहिल्या दिवसाला दीड लाख रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेत कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा दिला असतानाच मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बांधकाम केले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
71 87 percent voter turnout recorded in maharashtra legislative council elections
विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

हेही वाचा >>> विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी

विरारअलिबाग कॉरिडॉरसाठी कर्जास मान्यता

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २२ हजार २५० कोटी रुपये तर पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पाच हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज ‘हुडको’कडून घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्य रस्ते विकास महामंडळ हा प्रकल्प करीत असून त्यासाठी ११३० हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो तीनची सेवा लवकर सुरु करण्यासाठी शासनाच्या हिश्शाचे ११६३ कोटी रुपये निधी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनला देण्यासही मंजुरी देण्यात आली.

रेसकोर्सची जागा हरितपट्टा राहिला पाहिजे. हे काम मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राला देण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्या ठिकाणी क्लब हाऊस, वाहनतळ उभारण्याची गरज नाही. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते