मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा उद्या, रविवारी नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी केली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत.

हेही वाचा : Devendra Fadnavis: दादरमधील हनुमान मंदिराबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट!

सर्वाधिक रस्सीखेच शिवसेनेत

●मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे इच्छुक जमले होते.

●प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची इच्छा असल्याने शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

●यातूनच शिंदे यांनी फिरती म्हणजेच अडीच – अडीच वर्षे मंत्रीपदे वाटून देण्याचा तोडगा काढला आहे.