मुंबई : महाराष्ट्राचा चित्ररथ अखेर प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात सहभागी होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना यासंदर्भात विनंती केल्यावर हा निर्णय झाला. चित्ररथाच्या विषयाबाबत नवी दिल्लीत सोमवारी (२६ डिसेंबर) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अधिकारी सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 प्रजासत्ताकदिनीच्या संचलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक राज्याला दर-तीन वर्षांनी संधी मिळते. महाराष्ट्राचा चित्ररथ गेल्या वर्षी सहभागी होता व सर्व राज्यांमध्ये उत्तम चित्ररथासाठी प्रथम क्रमांकही मिळाला होता. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला संधी मिळणार नव्हती. पण चित्ररथासाठी विषयांबाबत ध्वनिचित्रमुद्रित सादरीकरण पाठविण्याची सूचना केंद्र सरकारने केल्याने चार विषय पाठविण्यात आले होते. महाराष्ट्राला संधी मिळणार नव्हती. त्यामुळे मी राजनाथसिंह यांच्याशी संपर्क साधून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आणि अन्य मुद्दय़ांचा विचार करावा, अशी विनंती केली होती, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पाच विषयांचा प्रस्ताव..

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, नारीशक्ती, लोकवाद्य परंपरा, राजर्षी शाहू महाराज, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष असे पाच विषयांचे प्रस्ताव चित्ररथासाठी पाठविण्यात आले आहेत.