मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड भागात एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटला. आज रसायनशास्त्राचा पेपर होता आणि काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. तपासणी केली असता या मुलांच्या फोनमध्ये आज होणाऱ्या रसायनशात्राचा पेपर आढळला. या पेपरफुटीच्या प्रकरणात एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या आधी या शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पाठवली होती.

यापूर्वी अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पेपर फुटल्याची तक्रार सोशल मीडियावर केली होती. प्रश्नपत्रिकेचे फोटो अनेक अ‍ॅप्सवर व्हायरल झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

१२वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा! पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

पेपर फुटलेला नाही, शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण –

“शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra class 12 chemistry paper leaked coaching centre owner arrested hrc