उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा गुरुवारी १९ जानेवारी रोजी साखरपुडा झाला. अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यभरातील अनेक दिग्गज उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: नीता अंबानींनी केलं धाकट्या सूनेचं स्वागत; नणंद इशाच्या बाळाला खेळवताना दिसली राधिका, पाहा साखरपुड्यातील खास क्षण

डिसेंबर महिन्यात अनंत व राधिका यांचा रोका झाला होता. त्यानंतर आज अंबानींच्या घरी दोघांच्या एंगेजमेंट सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुष्पगुच्छासह अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानी समारंभात पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर येत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी या शाही कार्यक्रमात हजेरी लावली.

दरम्यान, अनंत व राधिकाच्या साखरपुड्यात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. रणबीर-दीपिका, अक्षय कुमार, शाहरुख खान व कुटुंब, कतरिना कैफ, बोनी कपूर-अर्जुन कपूर, सारा अली खान, खुशी कपूर, जान्हवी कपूर, ऐश्वर्या राय, वरुण धवन पत्नी नताशा दलालसह, सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde at anant ambani radhika merchant engagement bash hrc