मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? अशी विचारणा केली. तसंच सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? असा टोलाही लगावला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले –

विधानसभेत प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपलं म्हणणं मांडलं. २२ ऑगस्ट २०२२ मधील आदेशात सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असल्याचं निदर्शनास आणून दिलं. उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली. काही लोकांना निवडणुकीची भीती वाटत आहे असा टोलाही त्यांनी लगावला. सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? सरकार घटनाबाह्य असेल तर त्यावर काही बोलणार नाही असंही ते म्हणाले.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर –

यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं “दर १० वर्षांनी लोकसंख्येची मोजणी होते आणि त्यानुसार प्रभागाचे क्रमांक वाढवले जातात. २० टक्क्यांच्या लोकसंख्येला आपण सहा प्रभाग वाढवले आणि ३.८ टक्के लोकसंख्येला नऊ प्रभाग वाढवले, ही विसंगती आहे. मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात ८९२ तक्रारी करण्यात आल्या आहेत”.

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर कुरघोडी! मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी

“बरेचसे सदस्य परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मिळाला असतानाही इतकी घाई का? असं विचारत आहेत. पण चुकीच्या माहितीच्या आधारे हा आरोप केला जात आहे. वकिलांनी योग्य माहिती न दिल्याने हा संभ्रम निर्माण झाला. आपण कायद्याविरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही,” असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचून दाखवला.

“२२ नोव्हेंबर २०२१ ला खानविलकर यांच्या खंडपीठाने ११ मार्च २००० पूर्वी अस्तित्वात असणारा राज्य निवडणूक आयोगाचा कार्यक्रम कायम राहील असं सांगितलं होतं. त्यावेळी २२७ प्रभाग होते. यानुसार, पूर्वीच्या निवडणुकीमधील प्रभागरचना कायम ठेवण्यात आली. राज्याचे प्रभाग पुनर्रचनेचे अधिकारही कायम ठेवले. त्यामुळे नगरपालिका, महापालिकांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन १० मार्च २०२२ मध्ये असणाऱ्या परिस्थितीनुसारच निवडणूक घ्याव्या लागतीत. म्हणजेच जनगणनेच्या आधाराविना करण्यात आलेली नवीन प्रभागरचना आणि प्रभाग संख्येतील वाढ सुप्रीम कोर्टाने अद्याप स्वीकारलेली नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

“मी नगरविकास मंत्री होतो, तरी धोरणात्मक निर्णय हा सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे जे चुकीचं आहे ते दुरुस्त करावंच लागेल. विरोधातील काहींचीही तक्रार असून ते बोलू शकत नाहीत. त्यांच्या मनातील भावना मी बोलून दाखवत आहे,” असा टोला यावेळी एकनाथ शिंदेंनी लगावला. आपण कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं.

“घटनेच्या विरोधात सरकार स्थापन केलं आहे असं काही म्हणत आहेत. रोज सकाळी ९.३० वाजता सुप्रीम कोर्टात अर्ज करायचे. पण लोकशाहीत क्रमांकाला महत्त्व आहे. आम्ही बहुमताच्या नियनामुसार काम करत आहोत. या देशात लोकशाही, कायदे, नियम आहेत. आम्ही त्याच्या विरोधात गेलेलोच नाही. आमच्याकडे भक्कम बहुमत असून ते वाढत चाललं आहे, आम्ही कशाला घाबरु. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट घटनेतील तरतुदीनुसारच निर्णय घेतात. आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही यामुळे सर्वांची अडचण होत आहे,” असं एकनाथ शिंदेनी सांगितलं.

Story img Loader