आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या गेल्या वर्षी लंडनमध्ये घेतलेल्या भेटीबद्दल तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यांनी सरकारकडे ते दिल्यावर या प्रकरणी काही कारवाई करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मारिया यांनी जुलै २०१४ मध्ये लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. मोदी यांच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर ही भेट झाली. अंडरवर्ल्डकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मोदी यांनी सांगितल्यावर मुंबईत येऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा मारिया यांनी केला आहे. भारतात परतल्यावर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांना आपण या भेटीची  माहिती दिली, गोपनीय कागदपत्रांमध्ये नोंद करून दहशतवादी कारवाया प्रतिबंधक विभागालाही (एटीएस) पत्र पाठविल्याचे मारिया यांनी म्हटले आहे. मात्र तरीही सरकारकडे स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
आयुक्तांनी जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकातील सर्व तपशील गृह विभागाकडे व पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये असूनही आयुक्तांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आल्याने मुख्यमंत्री फडणवीस हे त्यावर समाधानी नसल्याचे समजते. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने २०१० मध्ये देश सोडून गेलेल्या आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या मोदी यांच्यासारख्याची लंडनमध्ये भेट घेणेच आक्षेपार्ह आहे. परदेशात असलेल्या आरोपींच्या जीविताला धोका असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे करून उपयोग नाही, ती मुंबईत येऊनच केली पाहिजे, हे उघडच आहे. हा निरोप वकिलाकडेही देता आला असता आणि भेटीपूर्वी सरकारची पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित होते.मारिया यांचा खुलासा सरकारने स्वीकारला तर, परदेशात पळून गेलेल्या कोणीही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास मुभा असल्याचा अर्थ लावला जाऊ शकतो. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा झाली, याचे अन्य कोणतेही पुरावे किंवा तपशील उपलब्ध नाहीत. त्यामुळे आयुक्तांचे स्पष्टीकरण स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आता ही भेट घेणे योग्य होते की नाही, हा मुद्दा तपासला जाणार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मदतीचा ब्रिटिश राजघराण्याचा इन्कार
लंडन : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी ब्रिटिश राजघराण्यातील युवराज चार्लस्, त्यांचे बंधू अँड्रय़ू यांच्या नावाचा वापर प्रवास कागदपत्रे मिळवताना केला असे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.द संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ललित मोदी यांनी त्यांचे अनेक वर्षांपासून परिचित असलेले राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे द्वितीय पुत्र व डय़ूक ऑफ यॉर्क अँड्रय़ू यांच्या नावाचा वापर केला. त्यांनी ब्रिटिश गृहमंत्रालयाकडे त्यांच्या पत्नीच्या कर्करोग शस्त्रक्रियेसाठी पोर्तुगालला जाण्यासाठी प्रवास कागदपत्रे गेल्या जुलैत मागितली होती.बकिंगहॅम पॅलेसने ललित मोदी यांनी या दोघांच्या नावाचा वापर केल्याचा इन्कार केला आहे व डय़ूक ऑफ यॉर्क यांनी ललित मोदी यांच्या वतीने प्रवासी कागदपत्रे मिळवण्यासाठी रदबदली केल्याचा इन्कार केला आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की,  मोदी व डय़ूक ऑफ यॉर्क यांची अनेक वर्षांपासून ओळख आहे. पण त्यांनी कुठल्याही निर्णयावर प्रभाव टाकला नाही. मोदी यांच्याकडून त्यांनी भेटवस्तू किंवा आदरातिथ्य स्वीकारलेले नाही.